राज्यभरात परिचारिकांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

116

राज्यभरातील सरकारी रुग्णालये आणि दवाखान्यातील परिचारिकांनी शनिवारपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. या संपाचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होऊ नये म्हणून शिकाऊ परिचारिका आणि डॉक्टर्स यांच्या मदतीने काम सुरळीत पार पाडले जात असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचाः परिचारिकांच्या आंदोलनामुळे १०० हून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या)

शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

मुंबईत जे.जे. रुग्णालयात दैनंदिन 100 शस्त्रक्रियांपैकी केवळ 23 अत्यावश्यक शस्त्रक्रिया संध्याकाळपर्यंत करण्यात आल्या आहेत. जे.जे. रुग्णालयाशी संलग्न जी.टी. आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयात अंदाजे 30 ते 40 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे पहायला मिळत आहे.

रुग्णालय प्रशासनाची माहिती

जे.जे. रुग्णालयातून 765, सेंट जॉर्जेसमधील 141 तर जी.टी. रुग्णालयातील 146 परिचारिकांनी संपात सहभाग नोंदवला आहे. तत्कालीन शस्त्रक्रिया रुग्णालयात पार पाडल्या जात आहेत. उर्वरित शस्त्रक्रिया किमान पाच दिवसांसाठी पुढे ढकलल्या जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचाः परिचारिकांच्या आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.