मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्लास्टिकपासून बनविलेल्या नायलॉन मांजा किंवा अशा कोणत्याही कृत्रिम पदार्थांच्या वापराला, विक्रीला आणि साठवणुकीवर १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत पतंग उत्सवाच्या दरम्यान बंदी घालण्यात आली आहे. पोलीस उप आयुक्त विशाल ठाकूर यांनी त्यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.
फौजदारी गुन्हा दाखल होणार
दरवर्षी पतंग उत्सवादरम्यान प्लास्टिक किंवा तत्सम सिंथेटिक घटकाद्वारे तयार केलेल्या नायलॉन मांजामुळे माणसांना व पक्षांना दुखापत होत असल्याचे आढळून आले आहे. अशा जखमा अनेकदा प्राणघातक ठरतात, त्यामुळे नायलॉन किंवा प्लास्टिक किंवा सिंथेटिक धाग्यांपासून बनवलेल्या पतंग उडवण्याच्या नायलॉन मांजाच्या जीवघेण्या परिणामांपासून माणसांचे आणि पक्षांचे संरक्षण करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहे. हा आदेश १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड प्रक्रिया संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये दंडनीय राहणार आहे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
(हेही वाचा चित्रा वाघ यांचा उर्फीला विरोध; टार्गेट मात्र रुपाली चाकणकर)