Oath Ceremony Maharashtra : महंत आचार्य पीठाधीश्वर डाॅ.अनिकेतशास्त्री देशपांडे यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण 

229
Oath Ceremony Maharashtra : महंत आचार्य पीठाधीश्वर डाॅ.अनिकेतशास्त्री देशपांडे यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण 
Oath Ceremony Maharashtra : महंत आचार्य पीठाधीश्वर डाॅ.अनिकेतशास्त्री देशपांडे यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण 

राज्याच्या राजकीय पटलावर एक नवा सूर्य उगवत असताना, धर्माच्या प्रकाशानेही त्यांचे तेज वाढवले जाणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी नाशिकच्या (Nashik) पवित्र भूमीवरून सनातन हिंदू धर्मध्वजाचे वाहक, श्रद्धेचे प्रतीक, ज्ञानाचे सागर असे राजऋषि महंत डाॅ. अनिकेतशास्त्री देशपांडे (Aniket Shastri Deshpande) महाराज यांना आमंत्रण मिळाले आहे. ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. (Oath Ceremony Maharashtra)

(हेही वाचा – Chembur मध्ये डिजिटल अरेस्ट मध्ये १२ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक)

५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर रंगणार्‍या या ऐतिहासिक सोहळ्यात, महंत डाॅ. अनिकेतशास्त्री देशपांडे यांची उपस्थिती म्हणजे धर्माची आणि राजकारणाची एक गजकेसरी योगाची अद्भुत सांगड असणार आहे. राज्य शासनाने त्र्यंबकेश्वर व नाशिकच्या अनेक साधू-संतांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यात रामकृष्ण महाराज लहवितकर, महंत भक्तिचरणदास, महंत गणेशानंद सरस्वती, महंत रमणगिरी महाराज, माधवदास राठी, ह.भ.प. संजय धोंडगे, महंत सुधीरदास पुजारी, स्वामी संविदानंद सरस्वती, कांचनताई जगताप अशा मान्यवरांचा समावेश आहे. पण महंत डाॅ.अनिकेतशास्त्री देशपांडे यांचे नाव या यादीत विशेष उल्लेखनीय आहे.

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषारशास्त्री भोसले यांनी दिल्यानुसार, वारकरी संप्रदाय आणि हिंदू संस्कृतीचे जतन करणार्‍या या सरकारमध्ये धर्माचार्यांना विशेष स्थान आहे. आध्यात्मिक समन्वय आघाडीचे सहप्रदेशाध्यक्ष ह.भ.प. संजय धोंडगे यांनी या निमंत्रणाबद्दल आनंद व्यक्त करून म्हटले आहे की, “देश, धर्म आणि संतांचा सन्मान करणाऱ्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रण मिळणे हे माझे भाग्य समजतो.”

महंत डाॅ.अनिकेतशास्त्री देशपांडे यांचे धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अनमोल आहे. त्यांची उपस्थिती या सोहळ्याला आणखी दिव्यता सकारात्मकता प्रदान करेल, यात शंका नाही. त्यांच्या शुभाशीर्वादाने नवीन सरकारला राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. (Oath Ceremony Maharashtra)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.