एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मुंबईत मोठ्या संख्येने धडकणार असतानाच आता ओबीसी समाज देखील आपल्या मागण्यासाठी मुंबईत दाखल होणार असल्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेडगे (Prakash Shendge) यांच्याकडून देण्यात आला आहे. जसे जरांगे आरक्षणासाठी मुंबईत येत आहे. त्याचप्रमाणे आम्ही आरक्षण वाचविण्यासाठी मुंबईत धडकणार असल्याचे प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत. तर शेळ्या, जनावरे घेऊन आम्ही २६ जानेवारीला मुंबईत जाणार असल्याचे शेंडगे यांनी म्हटले आहे. धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली.(OBC Rally)
राज्य सरकारने मराठा समाजासाठी मराठा समाजासाठी काढलेला जीआर हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा असून याच जीआरच्या आधारे ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्यास आहेत. एवढी लोक ओबीसीमध्ये येत असतील तर हा ओबीसीवर अन्याय होत असल्याचं सांगत हा जीआर रद्द करावा अशी मागणी शेडगे यांनी केली आहे.(OBC Rally)
(हेही वाचा : Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे-पाटील गुरुवारी नवी मुंबईत, अवजड वाहनांना प्रवेशबंदी)
सोबतच नव्याने देण्यात आलेल्या कुणबी नोंदी रद्द करावे. या मागणीसाठी ओबीसी समाज मुंबईत मोर्चा काढणार असल्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.विशेष म्हणजे शेळ्या,मेंढर, जनावर घेऊन आम्ही मुंबईत जनावर असल्याचे शेंडगे यांनी म्हटले आहे. या मोर्चामुळे जर काही तणाव निर्माण झाला,तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचे देखील शेंडगे यांनी म्हटले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community