OBC Reservation : ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी केले आश्वस्त

'मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. हे करत असतांना कुठल्याही प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

149
Monsoon Session : अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मी सर्व समाजाला विनंती करू इच्छितो की, महाराष्ट्रात कुठलेही समाज एकमेकांसमोर उभे आहेत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे योग्य नाही. (OBC Reservation) ओबीसी समाजाला आश्वस्त करू इच्छितो की, कुठल्याही परिस्थितीत राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाविषयी भाष्य केले. (OBC Reservation)

(हेही वाचा – Shivaji Park : शिवाजी पार्क शिवसेना दोन गटातील राडा प्रकरणी गुन्हा दाखल )

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासंबंधी घोषणा केली आहे. मात्र हे करत असतांना कुठल्याही प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ओबीसी समाजाला आश्वस्त केले. (OBC Reservation)

मराठा आरक्षणविषयी वातावरण तापले असून राज्यातील नेते उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी ओबीसी नेत्यांची आहे. ओबीसींना दिलेले अतिरिक्त आरक्षण मराठा समाजाला मिळावे, अशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे. (OBC Reservation)

(हेही वाचा – Shivaji Park : शिवाजी पार्क शिवसेना दोन गटातील राडा प्रकरणी गुन्हा दाखल )

वन ट्रिलियन इकॉनॉमीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ”इकॉनॉमिक ॲडव्हायझर अकाउंटने ज्या शिफारसी केल्या होत्या, त्या संदर्भातील एक रोड मॅप प्रेझेंटेशन मंत्रिमंडळापुढे करण्यात आले. या शिफारशी कशा प्रकारे लागू करायच्या, त्याचा क्रम काय असला पाहिजे, गुंतवणूक कशी आणायची, अशा प्रकारचा रोड मॅप तयार करण्यात आला आहे. त्या दृष्टीने आता पुढची कारवाई होईल. चांगली सुरुवात झाली आहे आणि त्यातून निश्चितपणे गुंतवणूक वाढवून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करत आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना देता येईल.” (OBC Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.