Insta वर Shriram, Sita, Hanuman यांचे अश्लील विडंबन; भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

146
कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थानी असलेले प्रभू श्रीराम, सीता आणि हनुमान यांचे अश्लील विडंबन करणाऱ्या पोस्ट Insta वर टाकण्यात आल्या. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या म्हणून गया प्रसाद शिवशंकर पटेल यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २९९ आणि राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
तक्रादाराने म्हटले की, विशाल पटेल या साईटवर विश्व हिंदु परिषद, भाईंदर जिल्हा आयोजित सनातन एकता यात्रा श्री. प. धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धामजी यांच्या समर्थनार्थ सभी सनातनियों को राष्ट्रहित’ मध्ये सहभागी होण्याकरीता जय श्रीराम पदयात्रा काढल्याचा एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओबाबत एका अनोळखी व्यक्तीने श्रीरामाला शिवीगाळ करणारे कॉमेंट टाकली. १ डिसेंबर २०२४ रोजी आणखी एक पोस्ट टाकली, त्यामध्ये नग्न अवस्थेत असलेल्या महिला व झाडाबर श्रीरामाचा फोटो दाखवला, त्यामध्येही प्रभू श्रीरामाचे विडंबन केले. त्यातही श्रीरामाला शिवीगाळ केली आहे. याशिवाय zsqre या Insta आयडीवर तिरंगा ध्वजाच्या प्रतिमेवर चप्पल घालून पाय ठेवलेला फोटो टाकून त्यावर इंग्रजीमध्ये LE ME WITH PROUD असे लिहिलेले आहे.
अशा प्रकारे या Insta च्या आयडीवरील सुमारे आठ ते दहा पोस्टमध्ये हिंदु देवीदेवतांच्या फोटोंचा वापर करुन त्यांचा अपमान करुन धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तसेच राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. म्हणून लागलीच या पोस्टचे स्क्रिनशॉट काढून या Insta आयडी असलेल्या व्यक्तीविरुध्द तक्रार केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.