Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनानिमित्ताने तिरंगा फडकवण्यात मुसलमानांमध्ये लागली चढाओढ

117
हिजबुल दहशतवादी जाविद मट्टूचा भाऊ रईस मट्टू आपल्या घराच्या खिडकीतून तिरंगा फडकवताना दिसला.

कालपर्यंत देशात काही मुसलमान हे विभाजनवादी विचारांचे असायचे जे भारतभूमी, तिरंगा, वंदे मातरम या राष्ट्र प्रतिकांप्रती अभिमान न बाळगता धर्माला प्राधान्य देत. ज्यामुळे देशात मुसलमानांचे अस्तित्व कायम वेगळे दिसत आले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात राष्ट्र प्रथम हा विचार रुजवला. त्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. मागील वर्षापासून स्वातंत्र्यदिनी ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम सुरू केली. यंदाच्या वर्षी या मोहिमेला मुसलमानांमध्ये प्रतिसाद देण्यासाठी चढाओढ लागली आहे.

76वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना, शनिवारी हजारो लोक जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा येथे ‘मेरी माटी, मेरा देश’ तिरंगा रॅलीत सहभागी झाले.

पुलवामाच्या शासकीय पदवी महाविद्यालयात (महिला) काढण्यात आलेल्या विशाल तिरंगा रॅलीमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रवादाचा उत्साह दिसून आला.

या रॅलीत तरुण, शालेय मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विविध कार्यालयातील कर्मचारी, नागरी समाजाचे सदस्य, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

याआधी शुक्रवारी, “आझादी का अमृत महोत्सव” चा एक भाग म्हणून, जम्मू-कश्मीर पोलिसांनी काश्मीरमधील विविध पोलीस आस्थापनांमध्ये “मेरी माटी मेरा देश-मिट्टी को नमन” ही देशव्यापी मोहीम राबवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून एका रॅलीत लोकांनी ४०० फिट असलेला तिरंगा उचलला होता. ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत ही रॅली काढण्यात आली.

(हेही वाचा Goa : गोव्याचे मणिपूर घडवण्याचे षडयंत्र; फादर बोल्मेक्स यांच्याकडून शिवरायांचा अवमान, आता पुतळाही फोडला)

दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील वेरीनागच्या सादिवारा गावात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसह लोकांचा मोठा सहभाग होता. लष्कर आणि पोलिसांच्या मदतीने ही रॅली काढण्यात आली. पंचायत सदिवारा सरपंच फारुख अहमद गनी यांनी ४०० फूट लांब राष्ट्रध्वज घेऊन रॅलीचे नेतृत्व केले.

त्याचबरोबर, एका व्हिडिओमध्ये हिजबुल दहशतवादी जाविद मट्टूचा भाऊ रईस मट्टू आपल्या घराच्या खिडकीतून तिरंगा फडकवताना दिसला.

जाविद मट्टू, ज्याला फैसल/साकिब/मुसैब म्हणूनही ओळखले जाते, हा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित सक्रिय दहशतवादी आहे. सुरक्षा संस्थांच्या यादीत खोऱ्यातील टॉप १० लक्ष्यांमध्ये त्यांचा समावेश होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.