वक्फच्या मालमत्तांवर कब्जा करणारेच विधेयकाला विरोध करत आहेत; Kiren Rijiju केले ‘हे’ आवाहन

57

वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर कब्जा केलेल्या लोकांचा वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला (Waqf Board Amendment Bill) विरोध करीत आहेत. हे शक्तिशाली लोक निष्पाप लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी केला.

यासंदर्भात रिजिजू म्‍हणाले की, विधेयकावर टीका करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे; परंतु त्या टीकेला काही अर्थ असला पाहिजे. वक्‍फ विधेयकाला विरोध करणारे कोण आहेत? काही शक्तिशाली लोक आहेत ज्यांनी वक्फ मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे. ते निष्पापलोकांची दिशाभूल करत आहेत.

(हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्याला Iran कडून केराची टोपली; अणू करार करण्याकडे दुर्लक्ष )

केरळ कॅथोलिक बिशप काऊन्सिलने (Kerala Catholic Bishops’ Council, केसीबीसी) वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या आणि राज्य खासदारांनाही असेच करण्याची विनंती करणाऱ्या पत्राबाबत रिजिजू म्हणाले की, धार्मिक आधारावर अनेक संघटना केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या विधेयकाला पाठिंबा देत आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयक गरीब मुस्लिम, मुले आणि महिलांच्या हिताचे आहे यामुळे वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) अंतर्गत मालमत्तांच्या व्यवस्थापनात जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित होईल, असा विश्‍वासही रिजिजू यांनी व्‍यक्‍त केला.

रिजिजू म्हणाले, केरळ कॅथोलिक बिशप कौन्सिलने पाठवलेले विनंती पत्र सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध समुदायातील अनेक संघटना वक्फ (सुधारणा) विधेयकाला पाठिंबा देत आहेत. आपण हे समजून घेतले पाहिजे की, हे विधेयक मुळात गरीब मुस्लिम, मुले आणि महिलांच्या हिताचे आहे आणि वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने केले जाईल याची खात्री करते.

केरळ कॅथोलिक बिशप कौन्सिल आणि इतर अनेक ख्रिश्चन संघटना केरळच्या खासदारांना वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर भूमिका घेण्यास आणि त्याच्या बाजूने मतदान करण्यास सांगत आहेत. कारण केरळमध्ये कोचीनजवळील मुनांबम नावाच्या ठिकाणी, शेकडो गरीब कुटुंबांना वक्फकडून त्यांच्या जमिनी जप्त करण्याचा धोका आहे. जमीन जप्तीच्या धमकीविरुद्ध वर्षानुवर्षे सुरू असलेल्या आंदोलनावर प्रकाश टाकताना, केरळच्या खासदारांनी “तुष्टीकरणाचे राजकारण” करण्याऐवजी संकटात सापडलेल्या लोकांना मदत करावे असे आवाहनही रिजिजू (Kiren Rijiju) यांनी केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.