ऑक्टोबर महिना सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार बॅंकेचे व इतर महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करतात. तुम्ही सुद्धा बॅंकेचे व्यवहार करणार असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ऑक्टोबर महिन्यात दसरा-दिवाळी सण असल्यामुळे बॅंकांची कामे वेळेतच उरकून घ्या अन्यथा सणासुदीच्या सुट्ट्यांमुळे खातेधारकांची गैरसोय होऊ शकते. यामुळे आतापासूनच जाणून घ्या की, ऑक्टोबर महिन्यात बॅंका केव्हा सुरू असतील आणि केव्हा बंद…
( हेही वाचा : बेस्टचा स्वस्त मस्त प्रवास! मासिक, त्रैमासिक बसपासमध्ये ५० टक्के बचत )
आरबीआयने जारी केली यादी
आरबीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. या यादीनुसार ऑक्टोबर २०२२ मध्ये देशभरात १५ दिवस बॅंका बंद राहणार आहेत मात्र, महाराष्ट्रात केवळ १० दिवसच बॅंका बंद असतील. ऑक्टोबर महिन्यात देशाच्या विविध भागात सण साजरे केले जातात. यामध्ये दुर्गा पूजन, दसरा, दिवाळी या महत्त्वाच्या सणांचा समावेश आहे. बॅंका बंद असताना ग्राहक इंटरनेट बॅंकिंग, नेट बॅंकिंग आणि इतर सेवा वापरू शकतात.
ऑक्टोबर २०२२ मधील सुट्ट्यांची यादी
- १ ऑक्टोबर – सिक्किममध्ये बॅंका बंद, महाराष्ट्रात सुट्टी नाही
२ ऑक्टोबर ( रविवार) – महासप्तमी, गांधी जयंती – देशातील सर्व राज्यात बॅंका बंद
३ ऑक्टोबर ( सोमवार) – महाअष्टमी – देशातील बहुतांश राज्यात बॅंका बंद, महाराष्ट्रात सुट्टी नाही
४ ऑक्टोबर ( मंगळवार ) – महानवमी – देशातील बहुतांश राज्यात बॅंका बंद, महाराष्ट्रात सुट्टी नाही - ५ ऑक्टोबर ( बुधवार ) – दसरा – देशातील बहुतांश राज्यांसह महाराष्ट्रात बॅंक हॉलिडे
- ८ ऑक्टोबर – महिन्यातील दुसरा शनिवार
- ९ ऑक्टोबर – रविवार
- १६ ऑक्टोबर – रविवार
- २२ ऑक्टोबर – महिन्यातील चौथा शनिवार
- २३ ऑक्टोबर – रविवार
- २४ ऑक्टोबर – दिवाळी
- २५ ऑक्टोबर – दिवाळी ( २६ ऑक्टोबर काही बॅंका भाऊबीजेला सुद्धा बंद असतील)
- ३० ऑक्टोबर – रविवार