सध्या देशासह राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी सुरु असतांना दुसरीकडे मात्र ऑक्टोबर हिट वाढत आहे. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांमध्ये या ऑक्टोबर हिटच्या (October Heat) झळा अधिक तीव्र होणार आहेत. बुधवारपासून म्हणजेच १८ तारखेपासून कमाल तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा तडाखा अधिक बसू शकतो. केवळ मुंबईच नाही, तर देशातही यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान जाणवत असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यात सध्या विजेच्या (October Heat) मागणीत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईबाहेर वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या ग्राहकांकडून सोमवारी म्हणजेच १६ ऑक्टोबर रोजी २५ हजार २०९ मेगावॉट इतकी विक्रमी वीजमागणी नोंदवली गेली. ही मागणी पूर्ण करताना जवळपास ९,९०० मेगावॉट वीज महावितरणला बाहेरून खरेदी करावी लागली.
(हेही वाचा – NAMO 11-Clause : ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रमाअंतर्गत विभागांनी गतीने कार्यवाही करावी…!)
राज्यात मुंबई वगळता सर्वत्र महावितरण (October Heat) तर मुंबईत टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटी व बेस्ट यांच्याकडून वीज पुरवठा केला जातो. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने ऑक्टोबर महिना अधिक तापला आहे. त्यामुळेच मागील आठवडाभरापासून राज्यातील वीजमागणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एरवी ऑक्टोबर महिन्यामध्ये २२ हजार मेगावॉटदरम्यान असलेली महावितरणच्या राज्यभरातील २.७३ कोटी वीज ग्राहकांची मागणी गेल्या काही दिवसांत २४ हजार मेगावॉटच्यावर गेली होती. या मागणीने सोमवारी उच्चांकी पातळी गाठली. (October Heat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community