ओडिशामध्ये (Odisha Lightning Strikes) सध्या खूप भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ दोन तासांत तब्बल ६१००० वेळा आकाशातून वीज कोसळली आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. ओडिशा सरकारने मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांच्या नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. परंतू, पुढील ४८ तासांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ओडिशा राज्यात (Odisha Lightning Strikes) सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. भुवनेश्वर आणि कटक या शहरात अतिवृष्टी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने पुढच्या चार दिवसात अतिवृष्टी होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी जाहीर केलं आहे की, त्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे. भुवनेश्वर आणि कटक या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून गरज असल्यास बाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Monsoon Update : राज्यात पावसाचे पुनरागमन; पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज)
राज्यात कुठेही पावसाची स्थिती (Odisha Lightning Strikes) असली की लोकांनी लगेच सुरक्षित ठिकाणी जावे. तिथल्या प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक एचआर बिस्वास यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, ईशान्य बंगालच्या उपसागरातही एक चक्रीवादळ तयार झाले आहे. त्याचबरोबर आणखी एक वादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत मिळाले आहेत.
ओडिशात (Odisha Lightning Strikes) एकापाठोपाठ एक ६१००० वेळा वीज कोसळली. यापुढेही अशा घटना घडू शकतात, असे आयएमडीने म्हटले आहे, असे विशेष मदत आयुक्त (SRC) सत्यब्रत साहू यांनी सांगितले. मान्सून दीर्घ कालावधीनंतर सामान्य स्थितीत परत येतो, तेव्हा अशी असामान्य स्थिती बनते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजा कोसळतात. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारपर्यंत पुढील ४८ तासांत उत्तर ओडिशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community