‘सर तन से जुदा’ नंतर आता ‘काफिर को काटेंगे’; ओडिसात धर्मांध मुसलमानांच्या घोषणा 

127

१२ एप्रिलला ओडीसा राज्यातल्या संबळपूरमध्ये एका हिंदू जमावावर दगडफेक करण्यात आली. हनुमान जयंती समन्वय समिती आणि बजरंग दलाने बुधवारी रॅली काढली होती. ही बाईक रॅली जेव्हा धनुपाली भागातल्या मशिदीजवळ पोहोचली, तेव्हा त्यावर दगडफेक करण्यात आली. समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या मुस्लिमांनी द्वेषपूर्ण घोषणा देत रॅलीतल्या हिंदूवर हल्ला केला. पोलिस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी, १२ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता रॅली निघाली होती. या रॅलीत जवळपास १,००० बाईकस्वारांनी भाग घेतला होता. हजारो लोक असलेल्या या जमावाने गोविंदटोला ते गोलबाजार असा प्रवास केला. मात्र जेव्हा मोतीझरण चौकात हिंदू पोहोचले तेव्हाधर्मांध मुसलमानांनी दंगल घडवून आणली. त्यावेळी काफिर को काटेंगे, अशा घोषणा दिल्या.

२०० धर्मांध मुसलमान हिंदू युवकांवर धावून आले

या रॅलीच्या वेळी हिंदू धर्मीय त्या वेळी ‘जय श्रीराम’, ‘जय बजरंग बली’ असा उत्साह वाढवणाऱ्या घोषणा देत होते. या घोषणेनंतर जवळपास २०० धर्मांध मुसलमान हिंदू युवकांवर धावून आले. हा वाद सुरू असतानाच अचानक दगडफेकीला सुरुवात झाली. दगडफेक करण्यापासून सुरू झालेल्या या हिंसेत पुढे लाठी, तलवार, रॉड यांचा वापर करण्यात आला. एफआयआरमध्ये नोंद झाल्यानुसार मारेकऱ्यांनी जमावावर हल्ला करताना ‘साले काफिर लोग’, ‘साले लोगों को काट देंगे’, ‘सालों को इंडिया वापस नहीं जाने देंगे’, अशा घोषणा दिल्या. या प्रकरणी १५ ज्ञात व्यक्तींवर आणि १५० ते १६० अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ एप्रिलला घडलेल्या या घटनेमुळे हनुमान जयंती समन्वय समितीने परिसरात १४ एप्रिलपर्यंत बंद पुकारण्याचे आवाहन केले होते. समाजस्वास्थ्य अधिक बिघडू नये म्हणून प्रशासनाने संबळपूरमध्ये संपूर्ण ४८ तास इंटरनेट सेवा बंद केली. तसेच ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुकसारख्या इतर समाज माध्यमांवर बंदी घालण्यात आली.

(हेही वाचा तेव्हा भगत सिंगांनीही ब्रिटिशांकडे सुटकेसाठी केले होते आवेदन; पुस्तकातून केला दावा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.