Odisha Train Accident : सीबीआयकडून बहनगा रेल्वे स्थानक सील

अपघातानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक तपासात गाड्यांची उपस्थिती दर्शवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे आढळले होते.

207
Odisha Train Accident : सीबीआयकडून बहनगा रेल्वे स्थानक सील

ओडिशातील बालासोर (Odisha Train Accident) इथे 2 जून 2023 रोजी झालेल्या 3 गाड्यांच्या भीषण रेल्वे अपघातासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. अपघाताचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआय बहनगा स्टेशन सील केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही प्रवासी गाडी किंवा मालवाहू गाडी या स्थानकावर थांबणार नाही. येथून दररोज सुमारे 170 गाड्या जातात. अपघातानंतर याठिकाणी 7 गाड्या थांबल्या होत्या.

(हेही वाचा – Biporjoy Cyclone : मुंबईच्या किनाऱ्यावर धुळीचे प्रचंड लोट; समुद्रही खवळलेला)

यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासादरम्यान (Odisha Train Accident) सीबीआयने स्थानकात उपस्थित असलेली सर्व कागदपत्रे तपासली. तसेच लॉग बुक, रिले पॅनेल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. सीबीआयने आतापर्यंत कधी रेल्वे अपघाताची चौकशी केली नव्हती. अपघातानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक तपासात गाड्यांची उपस्थिती दर्शवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे आढळले होते. त्यामुळे या अपघातामागे घातपात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे तपास (Odisha Train Accident) सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला ओडिशातील बालासोर इथे 2 जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला तर हजारावर लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर गंभीर जखमींना 1 लाख रुपये तर किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.