Odisha Train Accident : ‘…म्हणून झाला अपघात’; अपघातामागील कारण आले समोर

घटनास्थळी ट्रेनचे (Odisha Train Accident) अवशेष हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे.

254
Odisha Train Accident : '...म्हणून झाला अपघात'; अपघातामागील कारण आले समोर

ओडिशातील (Odisha Train Accident) बालासोरमधील बहानगा रेल्वे स्टेशनजवळ तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत २८८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात सुमारे १००० लोक जखमी झाले. या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरु झल्या आहेत. विरोधी पक्षांनी आता रेल्वेच्या ‘कवच संरक्षण’ प्रणालीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. अशातच आता या अपघातांमागील एक कारण समोर आले आहे.

(हेही वाचा – Forced conversion : “मला जबरदस्तीने धर्मांतरही करायला लावलं, आणि…”; हिंदू असल्याचं भासवत मुस्लिम तरुणाने केले हिंदू मुलीवर अत्याचार)

यानुसार, कोरोमंडल एक्स्प्रेसचा (Odisha Train Accident) बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर थांबा नसल्याने कोरोमंडल भरधाव वेगाने प्रवास करत होती. याचवेळी कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा बाजार रेल्वे स्टेशन येथे एका मालवाहू रेल्वेला धडक बसली आणि कोरोमंडलचे २१ डबे रुळावरून खाली उतरले. इतकंच नाही, तर तीन डबे तर अपघातातील भीषण धडकेने उडून दुसऱ्या रेल्वे मार्गावर पडले. यावेळी यशवंतपूर-हावरा एक्स्प्रेस बहानगा बाजार रेल्वे स्टेशन येथून जात होती. तेव्हा हावरा एक्स्प्रेसची रेल्वे मार्गावरील दोन डब्यांना धडक होऊन अपघात झाला.

हेही पहा –

घटनास्थळी ट्रेनचे (Odisha Train Accident) अवशेष हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. आतापर्यंत या मार्गावरील ९० ट्रेन रद्द करण्यात आल्या तर इतर ४६गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. आज, म्हणजेच रविवार ४ जून रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh L. Mandaviya) ओडिशामधील परिस्थितीचा आढावा घेऊन जखमींची विचारपूस करणार आहेत. सध्या रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु असून सोमवारी ५ जूनपर्यंत रेल्वे ट्रॅक दुरुस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.