चिनी मोबाईल कंपनी व्हिवोच्या चार अधिकाऱ्यांना ईडीने (ED Action) अटक केली आहे. या कारवाईत एका चिनी नागरिकाचा समावेश आहे याशिवाय लाव्हा इंटरनॅशनल या मोबाईल कंपनीचे संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर हरि ओम राय यांनादेखील अटक करण्यात आली आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणात (money laundering case) अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीकडून झालेली ही मोठी कारवाई आहे.
गेल्या वर्षापासून मनी लॉंड्रिंग प्रकरणी देशभरात ४८ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. याबाबत अधिक तपास सुरू होता. लाव्हा कंपनीच्या हरि ओम राय यांचा या प्रकरणात नेमका कसा सहभाग आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
(हेही वाचा – ICC World Cup 2023 : नेदरलँड्स वि. न्यूझीलंड सामन्यात तिसऱ्या पंचांनी दिलेला निर्णय का ठरतोय वादग्रस्त?)
भारतातून अवैधरित्या चीनमध्ये पैसे ट्रान्सफर (Money transfer in China) करण्यात या कंपन्यांचा हात होता. व्हिवोने भारतात कमवलेल्या पैशांपैकी अर्धी रक्कम म्हणजेच तब्बल १.२५ लाख कोटी रुपये चीनला पाठवल्याचा आरोपही ईडीने केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community