Oil Prices : इंधनाच्या किमती उतरल्यामुळे विमान प्रवासही होणार स्वस्त

Oil Prices : विमान कंपन्यांनी तेलाच्या घसरत्या किमतींचा फायदा प्रवाशांना देऊ केला आहे

126
Oil Prices : इंधनाच्या किमती उतरल्यामुळे विमान प्रवासही होणार स्वस्त
Oil Prices : इंधनाच्या किमती उतरल्यामुळे विमान प्रवासही होणार स्वस्त
  • ऋजुता लुकतुके

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाच्या किमती ७७ अमेरिकन डॉलर प्रती बॅरल इतक्या खाली आल्या आहेत. त्याचा थेट फायदा आता विमान प्रवास करणाऱ्यांनाही मिळणार आहे. दोन महिन्यांच्या वाढीनंतर आता विमान तिकिटांचे दर कमी होत आहेत. कारण, विमानासाठी लागणारं इंधन स्वस्त झालं आहे. (Oil Prices)

(हेही वाचा- BoycottNetflix का होतंय ट्रेंड? ‘Netflix’ला केंद्र सरकारची नोटीस! काय आहे कारण?)

सलग दोन महिने जेट इंधनात वाढ केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात घट झाली आहे. त्यानंतर हवाई भाडे कमी होण्याची शक्यता बळावली आहे. जेट इंधनात वाढ झाल्यामुळं विमान कंपन्यांचा खर्च वाढतो. त्यामुळं त्यांना हवाई भाडे वाढवावे लागले आहे. जेट इंधनात कपात केल्यानंतर कंपन्यांना तिकीट दर कमी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. देशाच्या चार महानगरांमध्ये जेट इंधन किंवा एअर टर्बाइन इंधनाची किंमत काय आहे हे देखील सांगूया? (Oil Prices)

ऑगस्ट महिन्यात देशाची राजधानी दिल्लीत एटीएफची किंमत ९७,९७५. ७२ रुपये प्रति किलोलीटरवरून ९३,४८०.२२ रुपये प्रति किलोलीटरवर आली आहे. याचा अर्थ प्रति किलोलिटर किंमती ४,४९५.५ रुपयांनी कमी झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात कोलकात्यात एटीएफची किंमत १,००,५२०.८८ रुपये प्रति किलोलीटरवरून ९६,२९८.४४ रुपये प्रति किलोलीटरवर आली आहे. याचा अर्थ प्रति किलोलिटर किंमती ४,२२२.४४ रुपयांनी कमी झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात मुंबईतील एटीएफची किंमत ९१,६५०.३४ रुपये प्रति किलोलीटरवरून ८७,४३२.७८ रुपये प्रति किलोलीटरवर आली आहे. याचा अर्थ प्रति किलोलिटर किंमती ४,२१७.५६ रुपयांनी कमी झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात चेन्नईमध्ये एटीएफची किंमत १,०१,६३२.०८ रुपये प्रति किलोलीटर वरून ९७,०६४.३२ रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. याचा अर्थ प्रति किलोलिटर किंमती ४,५६७.७६ रुपयांनी कमी झाल्या आहेत. (Oil Prices)

(हेही वाचा- Shakib Al Hasan : शकीब अल हसनवर अटकेची टांगती तलवार)

देशांतर्गत विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट इंधनावर कमी खर्च करावा लागणार आहे. आता अशा विमानांना दिल्ली विमानतळावर ३९.३८ डॉलर स्वस्त जेट इंधन मिळेल. आता ऑगस्टच्या तुलनेत किंमत कमी होऊन ८५२.१२ डॉलर प्रति किलोलिटर झाली आहे. त्याचवेळी, कोलकाता (Kolkata) विमानतळावर जेट इंधनाची किंमत ३९.६५ डॉलरने कमी होऊन ८९०.८५ डॉलर प्रति किलोलिटर झाली आहे. मुंबईत (Mumbai) किमती ३९.७२ डॉलरने कमी होऊन सध्याची किंमती ८५१.३४ डॉलर प्रति किलोलिटर दिसत आहेत. तर चेन्नईमध्ये (Chennai) किंमत प्रति लीटर ८४६.९९ डॉलरवर वर पोहोचली आहे. तिथं किंमत प्रति किलोलिटर  ३९.६५ डॉलरने कमी झाली आहे. (Oil Prices)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.