Oil Prices : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत मोठी घट, ब्रेंट क्रूड ८० डॉलरवर

Oil Prices : मध्य-पूर्व आशियातील युद्धाची भीती ओसरल्यावर तेलाच्या किमतीही कमी झाल्या.

165
Oil Prices : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत मोठी घट, ब्रेंट क्रूड ८० डॉलरवर
  • ऋजुता लुकतुके

ब्रेंट तसंच अमेरिकन कच्च्या तेलाच्या किमतीत मंगळवार आणि बुधवारी मोठी घट झाली आहे. मध्य-पूर्व आशियात इस्त्रायल आणि इराण यांच्यादरम्यान युद्धाची वाटत असेलली भीती ओसरल्यावर तेलाच्या किमती हळू हळू स्थिर होत आहेत. अलीकडेच हमास संघटनेचा एक नेता तेहरानमध्ये मारला गेला. त्यावरून पॅलेस्टिनी नेते इस्त्रायलवर हल्ला करतील अशी भीती सगळ्यांना वाटत होती. युद्धाचे ढग कमी झाल्यावर एका दिवसांत मंगळवारी ब्रेंच तेलाचा दर १.४ डॉलरने कमी होईन तो ८०.९० डॉलर प्रती बॅरलला स्थिरावला. (Oil Prices)

तर अमेरिकेतील टेक्सासचं कच्चं तेलही प्रती बॅरल ७८.८९ डॉलरवर पोहोचलं. ‘इराण इस्त्रायलवर हल्ला करतील अशा भीतीने तेल बाजाराने आपले दर गेल्या आठवड्यात वाढवून ठेवले होते. पण, आता ती भीती हळू हळू दूर झाल्यावर कच्च्या तेलाचा वायदे बाजारातील प्रिमिअम कमी झाला आहे,’ असं प्राईस फ्युचर्स ग्रुपचे संशोधक फील फ्लिन यांनी सांगितलं. (Oil Prices)

(हेही वाचा – Hawkers Policy : नगर पथविक्रेता समिती निवडणूक; ४३ इच्‍छुक उमेदवारांनी घेतला सहभाग)

याउलट सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ब्रेंट तेल हे एकदम ३ टक्क्यांनी वाढून ८२.८७ अमेरिकन डॉलर प्रती बॅरलवर पोहोचलं होतं. त्यातच तेल उत्पादक देशांची संघटना ओपकनेही मागणी कमी होत असल्याचं पाहून तेल उत्पादनही कमी केलं. याचाही परिणाम किमतींवर झाला. आता ऑक्टोबरपासून ओपेक देश तेल उत्पादनात वाढ करतील, असा अंदाज आहे. (Oil Prices)

ओपेक देश, अमेरिका आणि इतर ठिकाणी बनणारं कच्चं तेल वाहून नेण्यासाठी मध्य-पूर्व हा मोक्याचा भाग आहे. त्यामुळे इथं युद्ध सुरू झालं असतं तर जगातील तेल वाहतूक थांबली असती. त्यामुळे तेलाच्या किमती भडकल्या होत्या. पण, आता इराणने हमासला युद्धविरामासह चर्चा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे युद्धाची शक्यता कमी झाली आहे. या आठवड्यात तेलाच्या किमती त्यामुळे आटोक्यात राहतील. (Oil Prices)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.