-
ऋजुता लुकतुके
रशिया – युक्रेन युद्धाचा थेट परिणाम आजही तेलांच्या किमतीवर होतोय. आणि सोमवारी सकाळी तेलाच्या किमतींनी तीन महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. याला कारण आहे अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदीला घातलेले निर्बंध. तेलाच्या व्यापारातून कमावलेला पैसा रशिया युक्रेनवरील हल्ल्यासाठी वापरत आहे, असा आरोप करत अमेरिकेनं रशियातील गॅझप्रोम नेफ्ट आणि सरगुटनेफ्टेगास या दोन तेल कंपन्यांकडून तेल खरेदी करणं थांबवलं आहे. तर रशियातून येणारी १८३ तेल जहाजंही अमेरिकेनं अडवली. (Oil Prices on High)
(हेही वाचा- Navi Mumbai Accident : नवी मुंबईत भीषण अपघात; दोन नोकरदार तरुणींचा मृत्यू, Video Viral)
या कारवाईमुळे तेलाचा पुरवठा कमी होऊन तेलाच्या किमती मात्र वाढल्या आहेत. यामुळे रशियाकडून तेल आयात करणाऱ्या चीन आणि भारतातील तेल पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. ब्रेट क्रूड तेलाचे भाव सोमवारी दीड टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ८१ अमेरिकन डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले आहेत. २७ ऑगस्ट २०२४ नंतरचा हा उच्चांक आहे. (Oil Prices on High)
अमेरिकेच्या ताज्या कारवाईचा खूप मोठा फटका रशियाला बसणार आहे. आणि भारत आणि चीनलाही रशियाकडून तेळ खरेदी कमी करून आखाती देशांवर अवलंबून राहावं लागेल. आणि यात भारताचं परकीय चलनही खर्च होणार आहे. भारतातही त्यामुळे तेलाचे दर वाढणार आहेत. (Oil Prices on High)
ही वाढ किमान काही महिन्यांसाठी अटळ असेल असा जागतिक बाजाराचा सध्या अंदाज आहे. ‘ओफॅक राष्ट्रांनी अमेरिकेच्या पुढाकाराने रशियावर लादलेल्या ताज्या निर्बंधांचा परिणाम भारतावर सर्वाधिक होणार आहे. कारण, रशियाकडून होणारी तेल आयात आता कमी होईल. आणि त्यांना आखाती देशांकडूनच तेल खरेदी करावं लागेल,’ असं ऑनिक्स कॅपिटल या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेचे संशोधन प्रमुख हॅरी टिलिग्विरिन यांनी म्हटलं आहे. हा परिणाम या तिमाहीत दिसून येईल, असा त्यांचा अंदाज आहे. (Oil Prices on High)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community