- ऋजुता लुकतुके
ओला कॅब्ज (Ola Cabs) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत बक्षी यांनी दिलेला राजीनामा आणि कंपनी १० टक्के कर्मचारी कपात करणार असल्याची बातमी यामुळे ओला कॅब्जच्या बहुचर्चित आयपीओ पूर्वी वेगळ्याच चर्चांना जोर आला आहे. भावेश अगरवाल यांनी सुरू केलेल्या या स्टार्ट अप कंपनीत एका वर्षापूर्वी बक्षी रुजू झाले होते. (Ola Cabs)
याशिवाय भावेश अगरवाल यांनी स्वत: कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून १० टक्के नोकर कपातीची बातमी दिली आहे. ५ अब्ज मूल्याच्या आयपीओ पूर्वी कंपनीची पुनर्बांधणी आवश्यक आहे आणि त्यासाठी कर्मचारी कपात आवश्यक असल्याचं अगरवाल यांनी ईमेलमध्ये म्हटलं आहे. १० टक्के म्हणजे जवळ जवळ २०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल असा अंदाज आहे. कंपनीच्या भविष्याचा विचार करून कर्मचारी कपात आवश्यक असल्याचं अगरवाल यांनी म्हटलंय. (Ola Cabs)
(हेही वाचा – Lok Sabha Election : सोलापुरात भाजपा हॅट्ट्रिक करणार की हुकणार?)
ओला कॅब्जचा (Ola Cabs) प्रस्तावित आयपीओ हा ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलरचा आहे. आणि कंपनीचं मूल्यांकन ५ अब्ज अमेरिकन डॉलर इतका आहे. ओला कंपनीला भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढवायची आहे. भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ओला कंपनीने आपला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युकेतील टॅक्सी सेवाही आटोपती घेतली होती. ओला कंपनीची ओला इलेक्ट्रिक ही उपकंपनी आहे. आणि तिच्या विस्तारासाठी ओला कंपनीला ५,५०० कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणायचा आहे. कंपनीने सेबी तसंच शेअर बाजारांना तसे प्रस्ताव दिलेले आहेत. पण, आता ओला कंपनीतून अशा विपरित बातम्या आल्या आहेत. (Ola Cabs)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community