सध्या महागाई शिगेला पोहोचली आहे. सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. आता यातच स्कूटर चालवणेही महागणार आहे. Ola S1 Pro ची किंमत लवकरच वाढणार आहे. सध्या या स्कूटरची किंमत 1 लाख 29 हजार 999 लाख रुपये आहे. बेंगळुरू स्थित मोबिलिटी फर्मने सांगितले आहे की, स्कूटरची किंमत 18 मार्च नंतर वाढवली जाईल. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनीही यासंदर्भात माहिती दिली आहे.
नवीन ऑर्डर एप्रिलमध्ये
ओलाने होळीच्या निमित्ताने ओचर कलरमध्ये Ola S1 Pro प्रदर्शीत केली आहे. तसेच, गेरू रंगासह Ola S1 Pro फक्त 18 मार्च म्हणजेच शुक्रवारीच खरेदी करता येणार आहे. कंपनीने सांगितले की, Ola S1 Pro च्या नवीन ऑर्डर्सची डिस्पॅच एप्रिल 2022 पासून सुरू होईल, जी थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवली जाईल. याशिवाय कंपनीने आपल्या स्कूटरसाठी नवीन अपडेट्सही जाहीर केले आहेत.
Purchase window is now open for all! The Ola S1 Pro is available at 129,999 only till tomorrow, 18th March. Get yours today, only on the Ola app! https://t.co/nf6TJsoTVk #JoinTheRevolution now⚡🛵 pic.twitter.com/d3l6W6DiUd
— Bhavish Aggarwal (@bhash) March 17, 2022
पूर्ण चार्ज झाल्यावर 181 किमी
कंपनीने Ola S1 Pro स्कूटरमध्ये 8.5kW ची बॅटरी दिली आहे. याला तीन राइडिंग मोड मिळतात – नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपर. इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 115 किमी/तास आहे. ते केवळ 3 सेकंदात 0 ते 40kmph चा वेग पकडते. कंपनीचा दावा आहे की, पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 181 किमी (ARAI प्रमाणित) पर्यंतची रेंज देऊ शकते.
( हेही वाचा :सावधान! वर्तमानपत्रात बांधून दिलेले अन्नपदार्थ खाताय? )
स्कूटरची वैशिष्ट्ये
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर, S1 Pro मध्ये क्रूझ कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, ‘टेक मी होम’ लाइट्ससह रिमोट स्टार्ट/स्टॉप आणि लॉक/अनलॉक यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. कंपनीने स्कूटरच्या दोन्ही चाकांमध्ये फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेकसह एकत्रित ब्रेकिंग सिस्टम दिली आहे.
Join Our WhatsApp Community