स्वातंत्र्यदिनी OLA ने केली मोठी घोषणा; भारतातील सर्वात वेगवान Electric car launch

114

Ole Electric ने देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त मोठी घोषणा केली आहे. कंपनीने पहिली इलेक्ट्रिक कार जगासमोर आणली आहे. त्याचसह नवीन ओला एस 1 स्कूटर लाॅन्च करण्याचेही जाहीर केले आहे. ओला एस 1 ची सुरुवातीची किंमत 99 हजार 999 इतकी असेल. ही ओलाची दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर असेल. कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

भावेश अग्रवाल यांनी ओलाच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलकही दाखवली. ते म्हणाले की, ओलाची पहिली इलेक्ट्रिक कार 2024 मध्ये येईल. त्यात जबरदस्त टेक्नोलाॅजी लेंस असेल. साधारण 500 किमी त्याची रेंज असेल. ओलाची पहिली कार सेडान सेगमेंटमध्ये येऊ शकते. या कारची डिझाईन युनिक असून, एकदा चार्ज केल्यावर 500 किमी धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. त्याचसोबत 0 ते 100 किमी स्पीड अवघ्या 4 सेकंदात पकडेल असेही ओलाने म्हटले आहे.

( हेही वाचा: युवकांमधील कौशल्य विकासाद्वारे रोजगार वाढीस प्राधान्य – मुख्यमंत्री )

सिंगल चार्जमध्ये 500 किमीपर्यंत धावू शकते

स्वतंत्रता दिवसाचा मुहूर्त साधत, या कारची पहिली झलक ओलाने दाखवली आहे. या कारची वरची बाजू पूर्णत: काचेची आहे. ही कार न्यू इंडियाला प्रेझेंट करेल. स्पोर्टी लूकमध्ये ही कार अत्यंत भारी दिसते. ओलाने इलेक्ट्रिक बाजारात सर्वात मोठा दावा केला आहे. एका सिंगल चार्जमध्ये ही कार 500 किमीपर्यंत धावू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.