८८ वर्षांच्या वृद्ध महिलेचे मृत्यूपश्चात त्वचादान

168

हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावलेल्या ८८ वर्षांच्या वृद्ध महिलेने मरणानंतर त्वचा दान करुन गुजराती समुदायात अवयवदानासाठी सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे. धनलक्ष्मी बेन लखमशी सत्रा असे या वृद्ध महिलेचे नाव आहे.

( हेही वाचा : ठाकरे गटाच्या खासदाराचे शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र; ‘तो’ १४ वा खासदार कोण?)

अंधेरी येथील क्रिटीकेअर रुग्णालयात या महिलेला अॅडमिट करण्यात आले होते. ९ फेब्रुवारी रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर १३ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांच्या परिचयातून सत्रा कुटुंबीयांचा संपर्क अवयवदान कार्यकर्त्यांशी झाला. अवयवदान कार्यकर्त्यांनी सत्रा कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व समजावून दिले. धनलक्ष्मी बेन लखमशी सत्रा यांना घरी आणल्यानंतर भायखळा येथील मसीना रुग्णालयातील डॉक्टरांनी घरी भेट देत त्वचा दान करण्यात आली. कुटुंबीयांना डोळे दान करण्याचीही इच्छा होती. परंतु वयोमर्यादेमुळे धनलक्ष्मी बेन यांचे डोळे दान करता आले नाही. या अवयदानामुळे समाजासमोर चांगला आदर्श निर्माण होईल, अशी आशा कुटुंबीयांनी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.