जुनी की नवी पेन्शन योजना? जाणून घ्या नेमका फरक काय आहे?

204

संपूर्ण राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी नवी पेन्शन योजना रद्द करून पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी संप पुकारला आहे. अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी यासाठी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा अवलंबला आहे. या पार्श्वभूमीवर नव्या आणि जुन्या पेन्शन योजनेत नेमका काय फरक आहे याबाबत जाणून घेऊया…

( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात परिचारिका संघटनेचाही सहभाग; रुग्णालयीन सेवेवर होणार परिणाम)

जुनी पेन्शन योजना

  • या योजनेत कर्मचाऱ्याच्या पगाराच्या अर्धी रक्कम निवृत्तीच्यावेळी पेन्शन म्हणून दिली जाते.
  • या योजनेत २० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी रक्कम उपलब्ध आहे.
  • जुन्या पेन्शन योजनेत पेमेंट सरकारच्या तिजोरीतून केले जाते.
  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी पेन्शनची रक्कम मिळते.
  • जुन्या पेन्शन योजनेत पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून एकही पैसा कापला जात नाही.
  • सहा महिन्यांनंतर डीए (महागाई भत्ता) मिळण्याची तरतूद आहे.

नवी पेन्शन योजना

  • नवी पेन्शन योजना भारत सरकारने २००४ पासून लागू केली आहे.
  • या योजनेअंतर्गत निवृत्तीच्यावेळी कर्मचारी एनपीएस फंडातील ६० टक्के रक्कम काढून घेऊ शकतात.
  • नव्या पेन्शनमध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या १० टक्के अधिक डीए कापला जातो.
  • निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी पेन्शन योजना निधीच्या ५० टक्के रक्कम गुंतवावी लागते.
  • निवृत्तीनंतर पेन्शनची निश्चित हमी नाही.
  • नवीन पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित असल्यामुळे येथे कराची तरतूद नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.