मुंबईत हवेची गुणवत्ता खराब होत असल्याने आता वृद्धांच्या आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत. श्वास व्यवस्थित न घेता येणे, सर्दी, खोकला या कारणांमुळे रुग्णालयातल साठीपार वृद्धांच्या उपचारांसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. मुंबई उपनगरातील अनेक रुग्णालयांमध्ये सध्या वृद्धांना अतिदक्षता विभागात उपचार द्यावे लागत आहेत. वृद्ध तसेच तरुणांमध्ये हिवाळ्यात हवेच्या ढासळत्या गुणवत्तेमुळे शास्त्रीय अभ्यासही वैद्यकीय क्षेत्रातून झालेला नसल्याची कबुली डॉक्टरांनी दिली.
हिवाळ्यात हवेची गुणवत्ता ढासळली की वृ्द्धांच्या आरोग्यावर पहिल्यांदा दुष्परिणाम जाणवतो. हिवाळ्यात प्रभातफेरीसाठी सकाळी बाहेर पडलेले वृद्ध, नातवंडांना शाळेत सोडण्यासाठी सकाळी घराबाहेर पडणा-या वृद्धांना सर्दी, खोकल्याचा त्रास जास्त जाणवू लागत असल्याचे निरीक्षण कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयातील डॉक्टरांनी नोंदवले. सकाळच्यावेळी सूक्ष्म धूलिकण हवेत जास्त प्रमाणात साचलेले असतात. वृद्धांची वयोमानाने रोगप्रतिकारकशक्ती क्षीण होत असते. कित्येकांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. सकाळची प्रभातफेरी आणि घरातील नातवंडांना सर्दी, खोकला झाला असेल वृद्ध माणसांना सर्दी आणि खोकल्याचा संसर्ग पटकन होतो, असे जनरल फिजिशियन्सनी सांगितले.
(हेही वाचा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आदित्य ठाकरेंचे विश्वासू नेते शिंदे गटाच्या वाटेवर
वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात गेल्या आठवड्यात वृद्धांना अतिदक्षता विभागात उपचार दिले गेले. रुग्णसंख्या वाढल्याने अतिदक्षता विभागही कमी पडल्याचे चेस्ट फिजिशियन डॉ. संजीव मेहता सांगतात. वृद्धांना आठवड्याभरापेक्षा जास्त काळ बरे होण्यासाठी लागतो. कित्येकदा उशिरा उपचारांसाठी आलेल्या वृद्धांना रुग्णालयात उपचाराअंती बरे होण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. वृद्धांमधील इतर आजारांच्या समस्यांमुळे उपचारांना अवधी लागतो. त्यातुलनेत तरुणांना बाह्य रुग्ण विभागात दहा दिवस उपचार दिल्यानंतर तब्येतीत सुधारणा होत असल्याने डॉ. मेहता म्हणाले.
Join Our WhatsApp Community