नवे दूरच, Police Patil यांचे जुने मानधनही प्रलंबित

260
नवे दूरच, Police Patil यांचे जुने मानधनही प्रलंबित

महसूल व गृह विभागाच्या विविध कामांसाठी गावपातळीवर दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांच्या (Police Patil) मानधनात एप्रिल २०२४ पासून ६ हजार ५०० रुपयांवरून १५ हजार रुपये वाढ करण्यात आली. परंतु, अद्यापही मानधनाची रक्कम पोलीस पाटलांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. वाढलेले मानधन पोलीस पाटलांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार, असा सवाल पोलीस पाटील (Police Patil) करीत आहेत. गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखणे, गावातील सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करणे, आरोपींना पकडण्यास पोलिसांना मदत करणे, गावातील भांडण तंटे मिटवणे, पोलिसांना तपासकार्यात मदत करणे, महसूल आणि पोलिस खात्यास वेळोवेळी आवश्यक माहिती देणे, यासह विविध कामे पोलीस पाटलांना करावी लागतात. (Police Patil)

(हेही वाचा – Congress Internal Conflict : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर)

पोलीस पाटलांना यापूर्वी ६ हजार ५०० रुपयांचे मानधन दिले जात होते. वाढती महागाई व जबाबदाऱ्यांमध्ये झालेल्या वाढीनुसार पोलीस पाटलांचे (Police Patil) मानधन वाढविण्याची मागणी सातत्याने केली जात होती. पोलीस पाटलांना पोलिस ठाण्यात आयोजित विविध बैठकींसाठी उपस्थित राहावे लागते. यासाठी त्यांना प्रवास भत्ता दिला जातो. हे भत्तेसुद्धा त्यांना वर्षनिहाय मिळत नाही. काही पोलीस पाटलांना गत सात ते आठ वर्षांपूर्वी वितरित केलेले भत्तेसुद्धा मिळाले नाहीत. भत्ते मिळण्यासाठीसुद्धा पोलीस पाटलांना पोलिस अधीक्षक कार्यालयात ‘अर्थ’पूर्ण फिल्डिंग लावावी लागते. (Police Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.