भारतात पर्यटनासाठी आलेल्या महिलेमुळे पाच जणांना नवे आयुष्य; स्पॅनिश नागरिकाकडून पहिल्यांदाच अवयवदान

164

अवयवदान म्हणजे ‘जीवनदान’ असं म्हटलं जात. त्यामुळे अनेक जण जिवंतपणे आणि मृत्यूनंतरही अवयवदान करतात. यामुळे बऱ्याच जणांना नवं आयुष्य मिळते. दरम्यान भारतात पर्यटनासाठी आलेल्या ६७ वर्षीय महिलेने मुंबईत आपला जीव गमावल्यानंतर अवयवदान केले आणि अवयवदानाच्या चळवळीत नवा आदर्श निर्माण केला. एका स्पॅनिश नागरिकाकडून भारतात पहिल्यांदाच अवयवदान झाल्याची घटना गुरुवारी मुंबईत पाहायला मिळाली.

नेमकं काय घडलं?

मुंबई भेटीसाठी स्पॅनिश पर्यटकांचा मोठा ग्रुप आला होता. यादरम्यान आठवड्याभरापूर्वी ५ तारखेला क्षेत्र भेटीवेळी ६७ वर्षीय वृद्ध महिलेला अचानक चक्कर आली. त्यानंतर ग्रुपमधल्या सदस्यांनी तिला तातडीने जसलोक रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या तपासणीत पक्षाघाताने चक्कर आल्याचे निदान झाले. त्यामुळे महिलेची दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आली. पण तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

यादरम्यान स्पेनहून तिच्या मुलामुलींनी मुंबई गाठली. डॉक्टरांनी महिलेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती तिच्या मुलांना दिली आणि १० जानेवारीला डॉक्टरांनी महिलेला ब्रेन डेड घोषित केले. या अवस्थेत रुग्ण जगत नाही याची कल्पना महिलेच्या मुलांना अगोदरपासून होती. त्यामुळे अखेरिस त्यांनी आपल्या आईच्या मृत्यूपश्चात हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंडे, यकृत आणि हाडांचे दान केलं. या अवयवदानामुळे पाच जणांना नवं आयुष्य मिळालं.

(हेही वाचा – हृदय आणि श्वसनविकाराच्या निदानासाठी तीन प्रमुख रुग्णालयात सी.टी स्कॅन मशीन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.