कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जुना मार्ग असलेल्या महाड-भोर, पुणे-पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. महाड-पुणे मार्गावरील वरंध घाटात पावसाळ्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळेच वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार येईल असा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.
( हेही वाचा : आपले गाव ते पंढरपूर; आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळाची विशेष सुविधा)
3 महिने बंद
सध्या रायगड जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वरंध घाट क्षेत्रात दरडी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच रस्ता खचण्याची शक्यता लक्षात घेऊन व पुढील धोकादायक परिस्थिती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिनांक 01 जुलै ते दिनांक 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत हा घाट अवजड वाहतुकीकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट किंवा अतिवृष्टीच्या काळात घाटात सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग
या मार्गावरील वाहतूक पुण्याकडे जाण्यासाठी महाड-माणगाव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे या मार्गे तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर या पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्याबाबतचेही आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जारी केले आहेत.
Join Our WhatsApp Community