देश ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि येत्या २५ वर्षांत सर्व क्षेत्रात जगाचे नेतृत्व करेल, असे मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी व्यक्त केले.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांनी आधी आरसा बघावा)
दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र –
नवी दिल्ली येथे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा राष्ट्रीय दृष्टीकोन’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बिर्ला (Om Birla) बोलत होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा व्यापक दृष्टीकोन त्यांनी अधोरेखित केला. राष्ट्रवादासाठी आणि युवकांमध्ये राष्ट्रवादाची भावना रुजवण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या (ए. बी. आर. एस. एम.) प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.
(हेही वाचा – Pune Municipality: पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प २० फेब्रुवारीला जाहीर)
ए. बी. आर. एस. एम. चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जे. पी. सिंघल म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश ज्ञानावर आधारित शैक्षणिक धोरण तयार करणे आहे जे विकसित भारताची निर्मिती करेल. (Om Birla)
अनेक मान्यवर उपस्थित –
यावेळी एमएनआयटी जयपूरचे प्रा. एम. के. श्रीमाली, एबीआरएसएमचे प्रा. महेंद्र कपूर, एनआयटी नागपूरचे प्रा. प्रमोद, एनआयटी हमीरपूरचे प्रा. हिरालाल मुरलीधर सूर्यवंशी, संत लोंगवाल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रा. मणिकांत पासवान, एनआयटीटीटीआर चंदीगडचे प्रा. भोलाराम गुर्जर आणि एनआयटी जालंधरचे प्रा. विनोद कुमार कनोजिया उपस्थित होते. (Om Birla)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community