हिंदूंच्या अस्तित्वासाठी आणि हिंदूंच्या व्यवसायवृद्धीसाठी सुरू झालेल्या ओम प्रमाणपत्र (Om Certificate) वितरण चळवळीचा कोकणातील शुभारंभ गुहागरमधल्या व्याडेश्वर मंदिरात करण्यात आला. ओम प्रतिष्ठानच्या मंजिरी मराठे यांनी त्रिपुरी पौर्णिमेला व्याडेश्वर चरणी ओम प्रमाणपत्र अर्पण करून या कार्यासाठी आशिर्वाद घेतला. गुहागरमधील अनेक महनीय व्यक्ती या देशकार्यात सहभागी झाल्या आहेत.
व्याडेश्वर मंदिराचे भूतपूर्व अध्यक्ष अरुण परचुरे, विद्यमान अध्यक्ष शार्दूल भावे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन दीक्षित, श्री देव त्रिविक्रम नारायण मंदिर, अडूरचे अध्यक्ष ऍडव्होकेट मंगेश जोगळेकर, पाटपन्हाळे हायस्कुलचे निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बापट, रविंद्र कानिटकर, अनंत काळे, अनिकेत कानिटकर असे अनेकजण ओम प्रमाणपत्र (Om Certificate) वितरण चळवळीशी जोडले गेले आहेत.
त्र्यंबकेश्वर येथून चळवळीला प्रारंभ
‘हिंदु शुद्धता मानक प्रमाणित’ (ओम प्रमाणित) दुकानातून प्रसाद आणि पूजा साहित्य खरेदी करण्याचे आवाहन ‘ओम प्रतिष्ठान’ आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी १४ जून २०२४ या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे केले होते. या दिवसापासून ओम प्रमाणपत्र (Om Certificate) वितरण चळवळीचा राज्यभरात शुभारंभ करण्यात आला होता. (Om Certificate)
(हेही वाचा Om Certificate : छत्रपती शिवाजी महाराजांची नीती वापरा; श्रद्धेचे युद्ध श्रद्धेने लढूया – रणजीत सावरकर)
ओम प्रमाणपत्राचा उद्देश
‘ओम प्रमाणपत्र’ (Om Certificate) ही हिंदूसंघटनासाठी, तसेच हिंदूंच्या अस्तित्वासाठी राबवण्यात आलेली चळवळ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्या नेतृत्वाखाली चालू झालेल्या या चळवळीतून ‘ओम प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली आहे. हे प्रतिष्ठान हिंदूंसाठी आहे. ‘प्रसादातील साम्रगी पूर्णतः शुद्ध साम्रगी आहे की नाही ?’, हे ‘ओम प्रमाणपत्र’ (Om Certificate) देण्यापूर्वी प्रथम पाहिले जाते.
हिंदु दुकानदारांच्या सक्षमीकरणासाठी ‘ओम प्रमाणपत्र’
देशभरातील दुकानदारांना ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ (Om Certificate) दिले जात आहे. हिंदु विक्रेत्यांकडून विक्री केले जाणारे उत्पादन, हे हिंदूंनीच शुद्धतेचे पालन करून बनवलेले आहे ना, याचीही खात्री केली जाणार आहे. ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ हा काही पैसे कमावण्यासाठी चालू केलेला व्यवसाय नाही किंवा शासकीय यंत्रणेला आव्हान देण्याचाही प्रयत्न नाही. हा हिंदूंच्याच सक्षमीकरणासाठी केलेला प्रयत्न आहे.
‘ओम प्रमाणपत्रा’च्या साहाय्याने दुकानांची नावे कशी शोधावी?
‘ओम शुद्धता प्रमाणपत्रा’वर एक ‘क्यू.आर्. कोड’ असेल. तो भ्रमणभाषद्वारे स्कॅन केल्यावर, ओम शुद्धता प्रमाणपत्र (Om Certificate) घेतलेल्या केंद्राचे नाव आपल्याला दिसेल. ते नाव आणि प्रत्यक्ष केंद्रावरचे नाव एकच असल्याचे पडताळून पहावे. ते एकच असेल, तर आपण योग्य ठिकाणी असल्याचे आपल्या लक्षात येईल. जर ‘क्यू.आर्. कोड’ स्कॅन केल्यानंतर दिसणारे नाव आणि केंद्राचे नाव एक नसेल तर ते प्रमाणपत्र अवैध आहे, हे आपल्या लक्षात येईल. अशावेळी तिथे खरेदी न करता, आपल्याला त्याची तक्रारही नोंदवायची आहे आणि अन्य शुद्धता मानक प्रमाणित दुकानातून खरेदी करायची आहे. हिंदूंच्या व्यवसायवृद्धीसाठी ‘ओम शुद्धता प्रमाणपत्र’ चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन ओम प्रतिष्ठानने केले आहे.
Join Our WhatsApp Community