ओम साई दर्शन प्रतिष्ठानतर्फे जीवन गौरव पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

131

चारकोप ओम साई दर्शन प्रतिष्ठान, सेक्टर ८ च्यावतीने रविवार, १७ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२१ च्या बक्षिस समारंभाला ‘संगीत शिवस्वराज्य गाथा’ हा संगीतमय शिवचरित्र सोहळा आयोजित करण्यात आला होता. संगीत स्वराज्य गाथा या प्रेरणादायी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना ‘हा सोहळा सर्वत्र व्हावा आणि लोकांनी शिवचरित्राच्या जागरातून प्रेरणा घ्यावी’, अशी ईच्छा प्रतिष्ठानच्यावतीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱे सचिव संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

जीवन गौरव पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

संगीत शिवस्वराज्य गाथा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आधारित ४२ नवगीतांमधून साकारलेल्या संगीत शिवचरित्र सोहळा आहे. लेखक, गीतकार, संगीत दिग्दर्शक, गायक अनिल नलावडे, सहगायिका दिप्ती आंबेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराजांचा इतिहास आपल्या ओघवत्या शैलीत कथन करणाऱ्या पद्मश्री राव, महापौर पुरस्कार, महापालिका माध्यमिक शिक्षक संघ व सहकारी पतसंस्था मर्यादित पुरस्कृत जीवन गौरव पुरस्कार विजेत्या परिणीता माविनकुर्वे तसेच जागतिक किर्तीचे तुतारी वादक पांडुरंग गुरव आणि बाळासाहेब कसार यांचा सत्कार नगरसेविका शिक्षण समिती अध्यक्षा संध्या विपुल दोशी ह्यांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आला.

कार्यक्रमाला लोकांचा भरघोस प्रतिसाद 

बक्षिस समारंभ नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्षा संध्या विपुल दोशी ह्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला माजी शाखा प्रमुख संजय उत्तेकर, जेष्ठ समाजसेवक साई भक्त मंडळ चारकोपचे अध्यक्ष बाळासाहेब कसार, साहेब प्रतिष्ठान चारकोपचे अध्यक्ष  राजन शिंदे, उपशाखा प्रमुख  शिवाजी घवाळी,  संदीप देसाई,  विशाल दळवी,  लक्ष्मण सुतार, अजय चौहान,  गायत्री व जयेश छपरानी, राखी, सुरेखा, ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे सर्वेसर्वा घनश्याम देटके, वैष्णवी पांचाळ, सामाजिक कार्यकर्ते नम्रता भोसले, स्वानंदी राणे, गिर्यारोहक व इतिहास अभ्यासक संजय तळेकर, स्पर्धेचे विजेते आणि असंख्य गणेश भक्त आवर्जुन उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.