शहरातील ओमायक्रोनबाधित रुग्णावर ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा रुग्णालयात करण्यात आलेल्या उपचाराचा सकारात्मक परिणाम होत आहे. आज पहिला रुग्ण बरा होवून घरी परतला. दरम्यान आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या प्रभावी अद्ययावत सुविधांबाबत या रुग्णाने महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. सद्यस्थितीत ओमायक्रोनचा संसर्ग कमी असून शहरातील बाधित रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने तात्काळ योग्य उपचार देण्यात येत आहेत. महापालिकेच्या रुग्णालयातील उपचारांच्या सकारात्मक परिणामाने ठाण्यातील ओमायक्रोनचा पहिला रुग्ण बरा होवून घरी परतला आहे.
महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून योग्य उपचार दिला जातो
१२ दिवसांपूर्वी या रुग्णाची ओमायक्रोनची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा रुग्णालयात उपचार सुरु होते. आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे रुग्णाची आज करण्यात आलेली चाचणी निगेटिव्ह आल्याने त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या रुग्णाने महापालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या अद्ययावत सुविधांबाबत प्रशासनाचे आभार व्यक्त केले. दरम्यान परदेशातून आलेल्या नागरिकांनी आपली माहिती महापालिका प्रशासनास द्यावी. तसेच ओमायक्रोनची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून योग्य उपचार दिला जात असून रुग्णांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
(हेही वाचा नगरसेवकांची संख्या वाढवण्यामागे सरकारमधील पक्षांची ‘सोय’! सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप)
Join Our WhatsApp Community