डोंबिवली, पुण्यापाठोपाठ दोन मुंबईकरांनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या सोमवारी दहावर पोहोचली. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग या प्रांतातून आलेल्या ३७ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉनचा विषाणू आढळून आला. हा रुग्ण २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत परतला होता. त्याचदिवशी अमेरिकेहून त्याची ३६ वर्षीय मैत्रीणही मुंबईत आली होती. दोघंही एकत्र राहत असल्यानं दोघांचीही कोरोना तपासणी पॉझिटीव्ह आली होती. मात्र तरुणानं दक्षिण आफ्रिकेहून प्रवास केल्यानं त्याच्या शरीरात ओमायक्रॉनचा विषाणू आहे का, याबाबतची जनुकीय तपासणी मुंबई महानगरपालिकेनं केली. त्यात दोघांच्याही शरीरात ओमायक्रॉनचा विषाणू आढळला.
राज्य आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या दोघांच्याही शरीरात कोणतीही लक्षणे आढळलेली नाही आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही लस घेतलेत. हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्यात डोंबिवलीत ओमायक्रॉनचा एक, पुण्यात सात, तर मुंबईत दोन रुग्ण आढळून आले आहेत.
(हेही वाचा ओमिक्रॉनला घाबरू नका! काळजी घ्या, पुणे महापौरांकडून आवाहन)
१ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तपासणी अहवाल
एकूण आलेले प्रवासी
अतिजोखमीचे देश – ६ हजार २६३
इतर देश – २८ हजार ४३०
एकूण – ३४ हजार ७००
आरटीपीसीआर केलेले प्रवासी
अतिजोखमीचे देश – ६ हजार २६३
इतर देश – ६३५
एकूण – ६ हजार ८९८
जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या
अतिजोखमीचे देश – ११
इतर देश – १
एकूण – ११