दक्षिण आफ्रिकेच्या टान्झानिया प्रांतातून मुंबईतील धारावीत परतलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालंय. मात्र या रुग्णाच्या शरीरात ओमायक्रॉनचा विषाणू आहे की नाही, याबाबत अहवाल प्रतिक्षेत आहे. हा अहवाल सकारात्मक आल्यास मुंबईतील ओमायक्रॉनची ही पहिली केस ठरेल.
रुग्णावर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार
डोंबिवलीतील ओमायक्रॉनची राज्यातील पहिली केस ताजी असतानाच रविवारी पुण्यात ओमायक्रॉन विषाणूच्या सात केसेस समोर आल्या. यात दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. या केसेसमध्ये तापाची सौम्य लक्षणे तर काहींमध्ये काहीच लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे धारावीतील ओमायक्रॉन संशयित रुग्णामुळे पालिका प्रशासन चांगलेच धास्तावलेय.
सध्या या रुग्णावर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ओमिक्रॉन व्हेरिंयंटचा धोका ओळखून या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी सुरु असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान परदेशातून मुंबईत परतलेल्या प्रवाशांमध्ये कोरोना आढळल्याची अजून सहा केसेस रविवारी उघडकीस आल्या. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.
(हेही वाचा लहान मुलांमध्ये ओमायक्रॉन वेगाने पसरतोय?)
Join Our WhatsApp Community