मुंबईतील कोरोना विषाणूच्या जनुकीय सूत्रांच्या १४ व्या चाचणी अहवालात मुंबईतील २३० पैकी सर्वच नमुने ओमायक्रॉनने बाधित झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोनाच्या संख्येमागे ओमायक्रॉन विषाणू असल्याची माहिती पालिका आरोग्य अधिका-यांनी दिली. २३० रुग्णांपैकी ७४ रुग्णांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची एकही मात्रा घेतलेली नसल्याचे आरोग्य विभागाच्या या जनुकीय अहवालाच्या १४ व्या सर्व्हेक्षणाअंती समोर आले. त्यापैकी मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास असलेल्या ४३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला.
( हेही वाचा : पुन्हा २२७ प्रभाग : प्रभागांच्या वाढीव क्षेत्रावर केलेली मेहनत पाणी)
२३० रुग्णांचे विश्लेषण –
- २३० नमुन्यांपैकी २८ टक्के म्हणजेच ६४ नमुने बीए २.७४ व्हेरिएंटचे आहेत.
- ४५ नमुने म्हणजे २० टक्के नमुने बीए २.७४ चे आहेत.
- २० टक्के म्हणजेच ४५ नमुने बीए २.७६ व्हेरिएन्टचे आहेत.
- १२ टक्के म्हणजेच २८ नमुने बीए २.३८ व्हेरिएंटचे आहेत.
- ८ टक्के म्हणजेच १९ नमुने बीए ५ व्हेरिएंटचे आहेत.
- ७ टक्के म्हणजेच १८ नमुने इतर व्हेरिएंटचे आहेत.
- ४ टक्के म्हणजे केवळ ९ नमुन्यांमध्ये बी.ए.२.३८.१ चे व्हेरिएंट आहेत.
- केवळ दोन नमुने बीए व्हेरिएंट ४चे आढळले.
२३० रुग्णांचे वयोगटानुसार विश्लेषण
- ० ते २० वर्षे – २६ नमुने (११ टक्के)
- २१ ते ४० वर्षे – ६८ नमुने (३० टक्के)
- ४१ ते ६० वर्ष – ६० नमुने (२६ टक्के)
- ६१ ते ८० वर्षे – ५९ (२६ टक्के)
- ८१ ते १०० वर्षे – १७ (७ टक्के)
या चाचण्यांपैकी १८ वयोगटातील २० रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी केली गेली. त्यापैकी ५ वर्षांच्या वयोगटातील ५ लहान मुले, १२ वर्षापर्यंत ५ नमुने तर १८ वयोगटापर्यंत १० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या लहान वयोगटातील एकाही रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून आलेली नाही.
२३० लसीकरणानुसार विश्लेषण
२३० कोरोनाच्या रुग्णांपैकी ७४ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची एकही मात्रा घेतलेली नव्हती. त्यापैकी १९ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १९ रुग्णांपैकी ३ रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र ४३ वर्षीय मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community