भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव झपाट्याने होताना दिसून येत आहे. गेल्या चार दिवसात देशातील रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतात सध्या ओमिक्रॉनचे दोनशेहून अधिक ओमायक्रॉन रूग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालय तसेच राज्य सरकारांनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरसाठी नियमावली जाहीर केली आहे.
सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत
देशात गेल्या 17 डिसेंबर रोजी ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 101 होती. त्यानंतर 19 डिसेंबरला त्यात भर पडून रुग्णसंख्या 126 वर पोहोचली. सध्या देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 200 वर पोहोचली असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात जवळपास 15 दिवसांपूर्वी कर्नाटमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर महाराष्ट्रात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. आताच्या घडीला ओमायक्रॉनने तब्बल 12 राज्यांमध्ये शिरकाव केला असून महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. त्यापाठोपाठ तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थानचा क्रमांक लागतो. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा अशा सूचना देखील आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा : आता तक्रार निवारण्यासाठी सरकार येणार तुमच्या दारी )
राज्यनिहाय रुग्णसंख्या
- महाराष्ट्र – 54
- दिल्ली – 54
- तेलंगणा – 20
- कर्नाटक – 19
- राजस्थान – 18
- केरळ – 15
- गुजरात – 14
- उत्तर प्रदेश – 02
- आंध्र प्रदेश – 01
- चंदीगढ – 01
- तमिळनाडू – 01
- पश्चिम बंगाल – 01