मुंबईसाठी जी चिंता वाटत होती, तिच समोर आली आहे, कारण आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत ओमायक्रॉन बाधित रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला होता. परदेशातून आलेल्या एका मौलवीचा रिपोर्ट हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे.
पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला मौलवी
डोंबिवलीमधील आढळलेला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण निगेटिव्ह आढळल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला होता. पण आता परदेशातून मुंबईतील धारावीत आलेल्या एका नागरिकाचा कोविड रिपॉर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आता समोर आला असून ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेली व्यक्ती ही मौलवी आहे. मुंबई आल्यानंतर ते धारावी येथील एका मशिदीत वास्तव्यास होते. सुरुवातील या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. तो अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले आहे. धारावीमध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. या मौलवीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या मौलावीला तातडीने क्वारंटाइन करण्यात आले आहे.
(हेही वाचा हेलिकॉप्टर दुर्घटनेचे ‘हे’ उलगडणार रहस्य!)
Join Our WhatsApp Community