राज्यभरात आता कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. कोरोनाची तिसरी लाट अगदी शेपटीएवढी उरलेली असताना राज्यातील औरंगाबाद आणि सिंधुदुर्गात खूप दिवसांनंतर ओमायक्रॉनचे रुग्ण दिसून आलेत. पुण्यात एकाच दिवसांत ४१ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली. त्या खालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात १४ तर सिंधुदुर्गात १२ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र राज्यातील रुग्ण बरे होण्याचा टक्का काही अंश वाढल्याचे दिसून आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४ टक्के एवढे नोंदवले गेले.
आरोग्य विभागाची माहिती
तिसऱ्या लाटेचा प्रभाव आता हळूहळू कमी होत असून, राज्यातील मृत्यूदर केवळ १.८२ टक्के नोंदवला गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असून राज्यात मंगळवारी ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही तिसऱ्या लाटेची नीचांक्की नोंद आहे.
मंगळवारच्या नोंदीतील ओमायक्रॉनचे नवे रुग्ण
- पुणे – ४१
- औरंगाबाद – १४
- सिंधुदुर्ग -१२
- जालना आणि नवी मुंबई – प्रत्येकी ८
- ठाणे – ५
- मीरा भाईंदर – ३
- सातारा – २
( हेही वाचा : ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत किती महाराष्ट्रीयन युक्रेनमधून परतले? )
राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या – ६ हजार १०६
राज्यातील कोरोना रुग्णांची नवी नोंद – ६७६