सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओमायक्रॉनचा प्रवेश!

208

ओमयाक्रॉनने राज्यात प्रवेश केल्यानंतर, तब्बल दीड महिन्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओमायक्रॉनचा प्रवेश झाला. सिंधुदुर्ग राज्यातील पाच रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

मुंबई ओमायक्राॅन रुग्णांत प्रथम

सोमवारी राज्यातील विविध भागांतून तब्बल ९१ रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचा विषाणू आढळला. सर्वात जास्त रुग्ण नागपूरात दिसून आले. एकाच दिवसांत नागपूरात १८ ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल औरंगाबाद, रायगड आणि नवी मुंबईत प्रत्येकी ११ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. मुंबई व ठाण्यातही प्रत्येक ८ नवे ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत सर्वात जास्त ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद होत आहे. आतापर्यंत मुंबईत १ हजार ६२ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. ठाण्यात ओमायक्रॉनच्या एकूण नोंदीची संख्या दुस-या स्थानावर आहे. ठाण्यातील रुग्णसंख्या ६२ वर पोहोचली आहे. तर तिस-या स्थानावरील नवी मुंबईत आतापर्यंत २४ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

( हेही वाचा: रेल्वेनं प्रवास करताना साखळी ओढताय? सावधान! नाहीतर…)

या जिल्ह्यांतही ओमायक्राॅन रुग्ण

सिंधुदुर्गपाठोपाठ सोमवारी साता-यातही पाच नव्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद आढळली. अमरावती ग्रामीण भागांतही ओमायक्रॉन वाढत आहे. नव्या ४ रुग्णांच्या नोंदीमुळे अमरावती ग्रामीण भागांत आतापर्यंत ३६ रुग्ण आढळले आहेत. तर यवतमाळमध्ये नवा एक रुग्ण आढळल्याने, आतापर्यंतच्या नोंदीची संख्या ४ वर पोहोचली.

पहिल्या तीन स्थानावरील ओमायक्रॉनची बाधा झालेले रुग्ण

सततच्या पुणे शहर  भागांतील वाढत्या नोंदीमुळे पुणे शहरांत सर्वात जास्त ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद होत आहे. सोमवारी पुण्यात ४ नव्या नोंदीमुळे आता एकूण रुग्णांची संख्या १ हजार २३८ वर पोहोचली. दुस-या स्थानावर मुंबईचा क्रमांक लागतो. मुंबईत एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता १ हजार ६२ वर नोंदवली गेली. नागपूरात १८नव्या नोंदीमुळे आता २४४ पर्यंत रुग्णसंख्या नोंदवली गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

जनुकीय तपासणीत अर्धा टक्के रुग्ण ओमायक्रॉनबाधित

राज्यात आतापर्यंत ६ हजार ७१६ ओमायक्रॉन तपासणीच्या जनुकीय चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी ३ हजार २२१ रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचा विषाणू आढळून आला. राज्यात सध्या १ हजार ५३९ ओमायक्रॉनबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.