ओमायक्रॉन विषाणूच्यासाठी आवश्यक जनुकीय तपासणीला मर्यादा येत असल्याने राज्यात सोमवारी वर्षाच्या सुरुवातीनंतर दुस-यांदा नव्या नोंदीचा आकडा कमी नोंदवला गेला. सोमवारी राज्यात केवळ ३१ नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जनुकीय तपासणीच्या कीट्सच्या उपलब्ध प्रमाणाबाबत पुन्हा प्रश्च चिन्ह उभे राहिले आहे.
ओमायक्रॉन चाचणीच्या कीट्सचा तुटवडा
राज्यातील बहुतांश रुग्णांची तपासणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतून होत आहे. मात्र त्यातुलनेत फारच कमी नोंदणी राज्यभरातून होत आहे. भारतातील तिसरी लाट ही ओमायक्रॉन विषाणूची असल्याने ओमायक्रॉनच्या तपासणीचे आवश्यक कीट्स प्रत्येक सरकारी प्रयोगशाळेत पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे किट्स परदेशातून मागवण्यात येत आहेत. दुस-या लाटेच्या फटक्यात डेल्टा विषाणूमुळे कित्येक रुग्णांनी जीव गमावला. कोरोनाबाधितांना डेल्टा विषाणू ओळखण्यासाठी आवश्यक साधनसामग्री सरतेशेवटी भारतातच तयार केली गेली. त्यातुलनेत ओमायक्रॉन जीवघेणा नाही, शिवाय आठवड्याभराच्या उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होत असल्याने जनुकीय तपासणीबाबत फारशी गांभीर्यता सरकारी पातळीवर नसल्याचे दिसून येत आहे.
देशात ओमायक्रॉनची तिसरी लाट आहे. मात्र जनुकीय तपासणीची सुविधा अद्यापही उपलब्ध झालेली नाही. परिणामी ओमायक्रॉनचे रुग्ण शोधण्यात राज्यात मर्यादा दिसून आली आहे. कित्येकजण घरात रॅपिड एन्टीजन तपासणी करून उपचार घेण्यावर भर देतात. मात्र स्थानिक संस्थाना याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. कित्येकांनी साधा सर्दी, खोकला समजून कोरोना तपासणीपासून लांब राहणे पसंत केले आहे. त्यामुळे अद्यापही कोरोनाचेही रुग्ण नेमके समजत नाही आहेत.
– डॉ दीपक बैद, जनरल फिजिशियन
(हेही वाचा ओमायक्रॉन चाचण्या घटल्या! कारण वाचून थक्क व्हालं…)
कोणाकडे सुरु आहे जनुकीय तपासणी?
अगोदर हा अहवाल पुण्याची राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था देत होती. आता या संस्थेसोबत पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय तसेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आणि राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रातूनही जनुकीय चाचण्या केल्या जात आहेत. तरीही अपेक्षित रुग्ण संख्या गाठण्यात सरकारी पातळीवर अपयश आल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community