राज्यातील ५४ टक्के रुग्णांना ‘या’ रोगाचा संसर्ग!

119

जानेवारीच्या सुरूवातीला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे राज्यात तिसऱ्या लाटेचे आगमन झाले. राज्यात तपासणी केलेल्यांपैकी ५४ टक्के रुग्णांना कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला असल्याचे निदान प्रयोगशाळांमधून करण्यात आले. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पाच हजार रुग्णांना ओमायक्रॉन झाल्याचेही सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

( हेही वाचा : कुपोषित बालकांच्या पैशाने कोण बनले सुृदृढ? )

आरोग्य विभागाची माहिती

राज्यात आतापर्यंत ९ हजार ३८२ रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आले. त्यात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा (एनआयव्ही), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एनसीसीएस), बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय यांचा समावेश होता. राज्यातील अशा वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधून तपासलेल्या नमुन्यांपैकी ८ हजार ७१४ नमुन्यांचे अहवाल राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला आतापर्यंत मिळाले आहेत. त्यापैकी ५ हजार पाच रुग्णांना (५४ टक्के) कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

राज्यातील वेगवेगळ्या प्रयोगशाळांकडे ६६७ नमुन्यांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत, असेही विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. राज्यात ओमायक्रॉनचे २३४ नवीन रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण मुंबईमध्ये आहेत. हे सर्व अहवाल कस्तुरबा हॉस्पिटल प्रयोगशाळेने दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.