परदेशातून आलेले ९ प्रवासी कोरोनाबाधित

परदेशातून आलेल्या प्रवाशांची आता कसून तपासणी करण्यात येत असून आतापर्यंत मुंबईत परतलेल्या ४८५ प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. या प्रवाशांपैकी ९ प्रवाशांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले असून त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या चाचणीचे नुमने आता जनुकीय गुणसूत्र पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

४८५ प्रवाशांची तपासणी

मुंबईतील विमानतळावर ओमिक्रॉनच्या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीकोनातून प्रत्येक प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये मुंबईच्या विमानतळावर दाखल झालेल्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत परदेशातून मुंबईत परतलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये आतापर्यं एकूण ४८५ प्रवाशांची तपासणी करण्यात आल्या आहेत. त्यातील ९ प्रवाशांच्या कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळून आल्या असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

एक कोरोनाबधित दक्षिण आफ्रिकेचा

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या शोध मोहिमेमध्ये लंडनमधून आलेले ५ प्रवाशी, दक्षिण आफ्रिका, मॉरिशियसम, जर्मनी, पोर्तुगाल आदी भागांमधून आलेल्या प्रत्येकी एका प्रवाशाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये १० नोव्हेंबर रोजी लंडनवरून आलेल्या २५ वर्षीय तरुणासह २५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका आणि मॉरिशियसनहून आलेल्या प्रत्येकी ३९ व ४७ वर्षीय नागरिकांचा समावेश आहे. अशाप्रकारे एकूण ९ प्रवाशांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला असून त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरु असल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांचे नमुने जनुकीय गुणसूत्र पडताळणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले जनुकीय गुणसूत्र पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here