ओमिक्रॉनची दहशत : मुंबईच्या विमानतळावरच नाकाबंदी

133

मुंबईत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नसून ज्या २६ जणांच्या चाचणी केल्या होत्या त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर कसून तपासणी केली जात आहे. यासाठी विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक द्वारावर महापालिकेसह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तपासणी केली जात असून कोणत्याही प्रकारे प्रवासी विमानतळामधून तपासणी विना बाहेर पडूच शकत नाही, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विमानतळावरील एकप्रकारच्या नाकाबंदीमुळे मुंबईत रुग्णांचा शोध विमानतळावर घेतला जाणार आहे.

विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांचे स्कॅनिंग होते

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना मुंबईत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नसल्याचे सांगितले. मुंबईकरांनी या आजाराला घाबरण्याची गरज नाही, परंतु काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. यापूर्वीचे कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सामना केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका आणि जनतेने करून त्या परतवून लावल्या आहेत. त्यामुळे तिसरी लाट येणार नाही, म्हणून प्रत्येक नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे महापौरांनी सांगितले. विमानतळाची आपण स्वत: पाहणी केली असून बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. त्यामुळे विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांचे सर्वच बाजुंनी स्कॅनिंग केले जात आहे. यापूर्वी असलेल्या विमानतळावरील प्रवेशद्वारांवर तपासणीसाठी महापालिकेसह शासनाची पथके तैनात आहेत. त्यामुळे विमानतळावर एकही बाधित प्रवाशी मुंबईत येणार नाही, अशी खात्री त्यांनी दिली आहे. आतापर्यंत एक रुग्ण आढळून आला असला, तरी मुंबईत अशा प्रकारचा एकही रुग्ण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा माहुलच्या पंपिंग स्टेशनच्या जागा अदलाबदलीचा प्रस्ताव चर्चेविना मंजूर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.