भारतातील ओमायक्रॉन विषाणूच्या केसेसमध्ये पुण्यातील दीड वर्षाच्या मुलीला ओमायक्रॉनची लागण झाल्याने पालकवर्ग चांगलाच धास्तावला आहे. दक्षिण आफ्रितेली ओमायक्रॉनची बाधा झालेल्यांमध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचेही प्रमाण लक्षणीय प्रमाणात दिसून येत आहे. लहान मुलांमध्ये अद्यापही लसीकरण सुरु नसल्याने आता लसीकरणाची मागणीही पालकवर्गाकडून जोमाने सुरु झाली आहे.
कोव्हॅक्सिन लहान मुलांसाठी परिणामकारक
ओमायक्रॉन विषाणूच्या सर्व घटकांबाबत अद्यापही माहिती मिळायची आहे. दुस-या लाटेत डेल्टा विषाणू घातक ठरला होता. मात्र आता ओमायक्रॉनमुळे तिस-या लाटेचं देशासमोर संकट उभं राहिले आहे. भारत बायोटॅकचं कोव्हॅक्सिन लहान मुलांसाठीच्या लसीकरणात परिणामकारक ठरत असल्याचं अभ्यासातून दिसून येतंय. निदान या लसीला तातडीनं परवानगी द्यावी, अशी मागणी बालरोगतज्ज्ञांकडून केली जातेय. जन्मलेल्या मुलांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती नसते. यात किमान वर्ष, दीड वर्षाचा काळ जातो. मात्र लहान मुलांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींबाबत पालकांनी सजकता बाळगावी. पालकांमध्येही कोरोनाची सामान्य लक्षणं आढळल्यास आपल्या मुलांना स्वतःची कोरोना चाचणी होईपर्यंत दूर ठेवण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिलाय. तसंच लहान मुलांचं आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांची स्वच्छता राखण्याकडेही लक्ष द्या, असं आवाहनही बालरोगतज्ज्ञांनी केलंय.
(हेही वाचा पुण्यात दीड वर्षाच्या मुलीसह 6 जणांना ओमिक्रॉनची बाधा)
Join Our WhatsApp Community