आता ओमायक्राॅन ओळखणे झाले सोपे…

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओमायक्रॉनचा जगभरात झपाट्याने प्रसार होत असून, आरोग्य यंत्रणेसमोर एक मोठे आव्हान आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने झाल्यामुळे सर्व देशांमध्ये कोरोना संसर्गाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणेने ओमिक्रॉनविरुद्धच्या लढाईत ओमीशुअर या किटला मान्यता दिली आहे. या किटच्या आधारे आता ओमायक्राॅनची टेस्ट करण्यात येणार आहे.

ओमीशुअर किट सह चाचणी करणे सोपे 

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) ओमायक्रॉन चाचणीसाठी टाटा मेडिकल आणि डायग्नोस्टिक्सने विकसित केलेल्या RT-PCR किटला मान्यता दिली आहे. या नवीन टेस्टिंग किटचे नाव ओमिशुअर आहे. ओमिशुअरने (Omisure)  ओमायक्रॉनचे संसर्ग शोधण्यात येणार आहेत.

आयसीएमआरने परवानगी पत्र दिले

या संदर्भात, आयसीएमआर (ICMR) ने 30 डिसेंबर 2021 रोजी टाटा मेडिकल आणि डायग्नोस्टिक्सला स्वीकृती पत्र जारी केले आहे. पत्रात लिहिले आहे की, उत्पादकाच्या सूचनेनुसार चाचण्या घेतल्या जात आहेत. चाचण्यांचे सातत्य राखण्याची जबाबदारी किट उत्पादकाची असेल.

( हेही वाचा  :…म्हणून राज ठाकरेंनी घेतला आगामी दिवसांतील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय! )

भारतात ओमायक्राॅनचा उद्रेक

दरम्यान, भारतात 4 जानेवारी रोजी ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. आता भारतात एकूण संक्रमितांची संख्या 1 हजार 892 वर गेली आहे. त्यापैकी 766 बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 568 ओमायक्रॉन संक्रमित रुग्ण आहेत, तर दिल्लीत 382 रुग्ण आढळले आहेत.  कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 37 हजार 379 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 124 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here