सनातन संस्थेच्या वतीने Datta Jayanti च्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमांतून अध्यात्मप्रसार !

37
सनातन संस्थेच्या वतीने Datta Jayanti च्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमांतून अध्यात्मप्रसार !

सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या (Datta Jayanti) निमित्ताने मुंबई, मुंबई, उपनगर, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात एकूण ३८ ठिकाणी विविध दत्त मंदिरांजवळ ग्रंथप्रदर्शने लावून अध्यात्मप्रसार करण्यात आला. या ग्रंथ कक्षांच्या माध्यमांतून अध्यात्म आणि साधनेविषयी अलौकिक ज्ञान असलेले सनातनचे ग्रंथ भाविक आणि जिज्ञासू यांच्यासाठी उपलब्ध करण्यात आले. या सर्व ग्रंथप्रदर्शनांना भेट देणारे भाविक आणि जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद लाभला.

(हेही वाचा – पुणे महापालिकेकडून Maha Metro ला १४ कोटी रुपये देण्याची मान्यता)

दत्तगुरूंच्या (Datta Jayanti) उपासनेविषयीच्या ग्रंथांसह सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, आचारधर्म, धर्माचरण, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथ तसेच सात्त्विक उत्पादनांचे येथे वितरण करण्यात आले. सनातनच्या अनेक ग्रंथपदर्शनांवर यावेळी अनेक जिज्ञासूंनी साधना, वास्तूशुद्धी आदी विषयांवर शंकानिरसनही करुन घेतले, तसेच दैनंदिन जीवनात धर्माचरण आणि साधेनसाठी करावयाच्या कृती सुद्धा काही जिज्ञासूंनी समजून घेतल्या. दत्तजयंतीच्या (Datta Jayanti) पार्श्‍वभूमीवर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच दत्त उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना कळावे यासाठी व्याख्याने, फलक प्रसिध्दी, सोशल मिडीया आदी माध्यमातूनही लोकांचे प्रबोधन करण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.