मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने एकूण ५० शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. सन २०२२-२३ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्यासाठी महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक शाळांतील एकूण १४७ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. महापालिका सहआयुक्त डी. गंगाधरण यांनी सोमवारी या शिक्षकांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये २९ महिला शिक्षकांसह ३१ पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. तसेच पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये मराठी माध्यमाचे १६ शिक्षक, इंग्रजी माध्यमाचे ११, तसेच हिंदी व ऊर्दु माध्यमाच्या प्रत्येकी ७ शिक्षक आणि शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख आता लवकरच जाहिर होणार असून या पुरस्कार विजेत्या शिक्षकांना प्रत्येकी ११ हजार रुपये एवढी रक्कम त्यांना दिली जाणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ईसीएसद्वारे जमा करण्यात येणार आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा दिनांक ०५ सप्टेंबर हा जन्मदिवस आहे. त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून या दिवशी “आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने” महानगरपालिकेच्या शिक्षकांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी राजू तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचा – MHADA : म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत-२०२३ : ३५३३ पैंकी ३५१५ विजेत्या अर्जदारांना ऑनलाईन तात्पुरते देकार पत्र जारी)
पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे पुढील प्रमाणे –
मराठी माध्यम
दिनेश मोतीराम अंकूश (रमाबाई सहकार नगर)
पूर्वा प्रविण संखे (महाराष्ट हाऊसिंग बोर्ड एमपीएस)
नयना टिळेकर (सिताराम मिल कंपाऊंड)
अनुजा साबळे (मुंबई पब्लिक स्कूल,गव्हाणपाडा)
कविता माने (दत्तपाडा बोरीवली)
अभिलाष पाटील (एमपीएस राजेंद्र नगर बोरीवली)
जयेंद्र कदम (धारावी काळा किल्ला शाळा २)
तन्वी संखे (बोरीवली भरुचा रोड मराठी शाळा)
सविता राणे (भांडुप शिवाजी नगर शाळा)
सुनीता चंदनशीवे (कुर्ला विनोबाभावे नगर)
हिंदी माध्यम
श्रीकृष्ण केंद्रे (शीव जोगळेकर वाडी)
दिनेश सरियाम (संत कंकय्या मार्ग धारावी)
सोमनाथ थोरात (नारियलवाडी सांताक्रुझ )
आसीस रामजी शुक्ला (मुलुंड वीणा नगर)
श्यामनंदन यादव (कांदिवली हनुमान नगर)
आशा जयस्वाल (वाकोला उप प्राथमिक शाळा)
उर्दु माध्यम
तरनुम्म शब्बीर अहमद (एमपीएस कांबेकर स्ट्रीट)
नाजिया अंजुम मोहम्मद आरिफ (कुर्ला मोरेश्वर पाटणकर मार्ग)
शाह मसुद ईस्माईल शाह (शिवाजी नगर)
अंसारी मोह यासीन सनाउल्लाह (शिवडी क्रॉस रोड)
आसिफ शाह हबीब शाह (मारवली एम पूर्व विभाग)
अय्युबी सबा नाज राशिद शफीक (मदनपुरा व्होक)
गुजराती माध्यम
मनिषा हईत (गोरेगाव सिध्दार्थ नगर)
तामिळ माध्यम
अँथाँनी मुथय्या (आरे कॉलनी)
इंग्रजी माध्यम
सविता जगताप (देवनार कॉलनी, शाळा क्रमांक १)
प्रतिभा ढोले (देवनार कॉलनी शाळा १)
ज्योती वखारिया (एमपीएस परळ पोईबावडी)
शाहिन शेख (बोरीवली सोडावाला लेन)
प्रिती जाधव (चेंबूर कॅम्प मनपा शाळा)
शारीरिक शिक्षण
निता जाधव (घाटकोपर पंत नगर)
सुशीलकुमार मोरे (देवनार कॉलनी मनपा ऊर्दु क्रमांक़१)
चित्रकला विभाग
दिप्ती बारवाल (मानखुर्द शाळा क्रमांक १)
कार्यानुभूव विभाग
इस्माईल शेख (अंधेरी पश्चिम एमपीएस)
रुपारी नवीन कुमार बारी (एमपीएस कांदिवली गणेश नगर शाळा)
संगीत विभाग
गंधार जाधव (बर्वेनगर एमपीएस मनपा शाळा)
विनया बेंजामिन (सोडावाला लेन)
माध्यमिक शाळा
उर्दु विभाग
अंसारी राशिद अख्तर फैज अहमद (भायखळा मोहम्मद उमर रज्जब)
इंग्रजी शाळा
अर्चना सिंह (खेर नगर सांताक्रुझ)
हिंदी शाळा
विजय जयकर (कुलाबा मनपा शाळा)
मराठी शाळा
रेवणनाथ रोहोकले (कन्नमवार नगर माध्यमिक शाळा)
संध्या सावंत (बालविकास विद्या मंदिर जोगेश्वरी)
राजेश चंद्रकांत म्हात्रे (बीपीई वांद्रे पश्चिम)
विठ्ठल वाळुंज (मुलुंड विद्या मंदिर)
शुभांगी मेमाणे ( प्रबोधन कुर्ला प्राथमिक शाळा)
नंदिता चुरी ( विप्रमंचे विद्या मंदिर इंग्रजी प्रायमरी स्कूल दहिसर)
देवानंद शिंदे ( पिपल्स वेल्फेअर सोसायटी,शीव)
प्रशांत पाटील ( बीएम बामणे विद्यामंदिर)
कल्पना काळेकर (पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी प्राथमिक शाळा)
संदीप परब ( शिशू विकास प्राथमिक विद्यालय घाटकोपर)
कविता सचिद्दानंदन ( चेंबूर अँफँक इंग्लिश स्कुल)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community