सोशल मीडियात पाकिस्तान्यांची दमछाक करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी Pakistan नागरिकांची नाराजी दिसत आहे. १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस. या दिवशी बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर पाकिस्तानचा ध्वज झळकला जाणार, अशी अपेक्षा पाकिस्तानी नागरिकांना होती. पाकिस्तानी नागरिकांचा एक गट दुबईतील बुर्ज खलिफाजवळ याची प्रतीक्षा करत रात्री बारा वाजेपर्यंत वाट पाहत राहिला, पण इमारतीवर अंधारच दिसत राहिला. त्यामुळे बुर्ज खलिफाच्या विरोधात पाकिस्तानी नागरिक नाराजी व्यक्त करू लागले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर भारताचा स्वतंत्रदिन सुरु झाला आणि काही वेळा पुरता पाकिस्तानचा ध्वज झळकला. बुर्ज खलिफाने असे केल्याने पाकिस्तानी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
पाकिस्तानच्या Pakistan स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शेकडो लोक जगातील सर्वात उंच इमारती बुर्ज खलिफा इमारतीजवळ जमले होते. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा दिवस सरत गेला, घड्याळात १२ वाजले असतानाही इमारतीवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज झळकला नाही. काही क्षणांच्या धक्क्यानंतर जमाव पाकिस्तानच्या घोषणा देताना ऐकू आला.
I think Burj khalifa stopped displaying terror*st country’s flags.🔥🔥🔥👏👏💪👍
Jai Hind 🇮🇳🫡#IndependenceDayIndia #HappyIndependenceDay #dubai #BurjKhalifa #IndianFlag pic.twitter.com/wNBbMISBA0— Pardhiv Sai (@pardhivnamburu) August 15, 2023
एका महिलेने कथितपणे तिच्या मोबाईलवर संपूर्ण दृश्य रेकॉर्ड केले. ती म्हणत होती की, आता १२.०१ वाजले आहे आणि दुबईच्या अधिकाऱ्यांनी कळवले आहे की, बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज झळकवला जाणार नाही.’
दुबईमध्ये पाकिस्तान Pakistan आणि भारतातील नागरिक मोठ्या संख्येने राहतात. बुर्ज खलिफाने गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकिस्तानचा राष्ट्रध्वज झळकावले होता, परंतु यावर्षी राष्ट्रध्वज झळकवण्यासाठी पाकिस्तान्यांची दमछाक झाली.
Join Our WhatsApp Community