समृद्धी महामार्गावर (Samruddhi Express Highway) सर्वाधिक अपघात होत असल्याच्या घटना घडत असल्याचे सर्वानाच माहिती आहे . मात्र हे अपघात एका विशिष्ठ वेळेतच घडत असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत तर सर्वाधिक अपघाती मृत्यू हे रात्री १२ ते ३ च्या दरम्यान नोंदवण्यात आले आहे. ११ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या कालावधीमधील अपघातांबाबत महामार्ग (सुरक्षा) पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.
पंतप्रधानांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग सर्वात सुरक्षित असल्याचा दावा केला होता. परंतु, उद्घाटनापासून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गावर एकूण ७२९ अपघात झाले. त्यात १०१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर २६२ जण गंभीर तर ४८६ जण किरकोळ जखमी झाले. अपघातांचे विश्लेषण केले असता सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत सर्वाधिक २११ अपघात झाले. त्यापैकी १०५ अपघातांत कुणीही जखमी नाही. तर १०६ अपघातांत २१ जणांचा मृत्यू तर ६० गंभीर तर १२५ जण किरकोळ जखमी झाले. सर्वाधिक अपघाती मृत्यू रात्री १२ ते रात्री ३ पर्यंतच्या काळात झाले. या काळात ९१ अपघातांपैकी ३२ मध्ये कुणीही जखमी नाही. शिल्लक ५९ अपघातांत ४४ मृत्यू तर ३९ जण गंभीर तर ८४ जण किरकोळ जखमी झाले. रात्री ३ ते पहाटे ६ पर्यंत येथे १४६ अपघातांपैकी ६४ मध्ये कुणीही जखमी नाही. तर शिल्लक ८२ अपघातांत ९ मृत्यू, ७९ गंभीर तर ९६ जण किरकोळ जखमी झाले. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ पर्यंत येथे १६८ अपघातांपैकी ७२ मध्ये कुणीही जखमी नाही. तर शिल्लक ९६ अपघातांत १७ मृत्यू तर ७१ जण गंभीर तर १११ जण किरकोळ जखमी झाले. संध्याकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत येथे ५४ अपघातांपैकी ३४ मध्ये कुणीही जखमी नाही. तर शिल्लक २० अपघातात एकही मृत्यू नसला तरी ८ जण गंभीर तर ३५ जण किरकोळ जखमी झाले. रात्री ९ ते रात्री १२ पर्यंत येथे ५९ अपघातांपैकी ३१ मध्ये कुणीही जखमी नाही. शिल्लक २८ अपघातांत १० मृत्यू तर ५ जण गंभीर तर ३५ जण किरकोळ जखमी झाल्याचेही महामार्ग पोलिसांच्या अहवालात पुढे आले.
(हेही वाचा : Apple iPhone 15 : १२ सप्टेंबरला ‘आयफोन १५’ लाँच होण्याची शक्यता)
अतिरिक्त पोलीस महासंचालक महामार्ग (सुरक्षा) डॉ. रवींद्र सिंगल नुकतेच नागपुरात येऊन गेले. त्यांनी या वृत्ताला दुजोरा देत या अपघातांना अतिवेग, टायर फुटणे, महामार्ग संमोहन, यासह इतरही कारणे असून अपघात नियंत्रणासाठी विविध उपाय केल्याने गेल्या अनेक दिवसांपासून येथे मृत्यू नसल्याचा दावा केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community