रविवारी (23 जानेवारी) तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लाॅक ठेवण्यात आला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ब्लाॅक कालावधीत हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे, तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगाव दरम्यानची जलद मार्गवरील लोकल सेवा धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे. मध्ये रेल्वेवरील ठाणे-दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेला कामासाठी 14 तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
प्रवासास मुभा
रविवारी असणा-या या ब्लाॅक कालावधीत , पनवेल ते कुर्ला दरम्यान फलाट क्रमांक 8 वरुन विशेष लोकल सेवा चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लाॅक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करण्याची परवानगी आहे.
मध्य रेल्वेवर 14 तासांचा ब्लाॅक
मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गांवर 14 तासांचा मेगाब्लाॅक आहे. रविवारी दुपारी 12.30 वाजेपासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर 2 तासांसाठी ब्लाॅक असणार आहे. तर त्याच मध्यरात्री 1.20 वाजेपासून दुपारी 3.20 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर 14 तासांचा ब्लाॅक ठेवण्यात आला आहे.
( हेही वाचा: अखेर उत्पल पर्रीकर अपक्ष निवडणूक लढवणार…)
पश्चिम रेल्वे ब्लाॅक
पश्चिम रेल्वेमार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लाॅक आहे. या दरम्यान, सीएसटी ते बांद्रा/ गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ब्लाॅक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील बोरीवली ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या ब्लाॅकवेळी काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community