New Criminal Law : नवीन कायद्याच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी राज्यात ७६, तर मुंबईत १६ गुन्हे दाखल

80
New Criminal Law : नवीन कायद्याच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी राज्यात ७६, तर मुंबईत १६ गुन्हे दाखल

संपूर्ण भारतात १ जुलै पासून लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात नवीन कायद्याप्रमाणे ७६ गुन्हे दाखल झाले असून एकट्या मुंबईत विविध स्वरूपाचे १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्याची माहिती करून देण्यासाठी संपूर्ण राज्यभरात पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आलेली असली तरी काही प्रकरणांमध्ये किरकोळ चुका आढळून आल्या आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कायद्यात झालेल्या बदलांची सवय होण्यासाठी थोडा वेळ लागेल, बदललेल्या कलमांमुळे थोडा गोंधळ होत असल्याचे काही पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (New Criminal Law)

वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कॉन्स्टेबल पर्यंत सर्व पदांना नव्या प्रणालीमध्ये प्रशिक्षित करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS), आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) हे तीन कायदे देशभरात १ जुलै पासून लागू करण्यात आले आहे. भारतीय दंड संहिता (IPC) हा ब्रिटिश कालीन कायदा इतिहासजमा झाला असून सोमवारी महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला गुन्हा मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री उशिरापर्यंत राज्यभरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये ‘बीएनएस’ कायद्यानुसार ७६ विविध प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच मुंबई लोहमार्ग पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (New Criminal Law)

(हेही वाचा – धर्मांतरामुळे हिंदू अल्पसंख्यांक होतील; Allahabad High Court ने व्यक्त केली चिंता)

नवीन फौजदारी कायद्यांबद्दल संपूर्ण प्रशिक्षण

मुंबई शहराच्या पोलिस ठाण्यात नवीन कायद्यांतर्गत सोमवारी १६ गुन्हे नोंदवली, त्यातील पहिला गुन्हा दक्षिण मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेला पहिला गुन्हा हा सायबर फसवणुकीचा गुन्हा आहे. पावभाजी विक्रेत्याची फसवणूक केल्याप्रकरणी एका अज्ञात सायबर फसवणुकीवर BNS कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३; (CrPC) आणि भारतीय पुरावा कायदा, १८७२ (IEA) हे रद्दबातल करून भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS), आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) हे तीन नवीन कायदे २१ डिसेंबर २०२३ रोजी संसदेत मंजूर करण्यात आले. (New Criminal Law)

भारतीय दंड संहिता (IPC) या कायद्यात ५११ कलमे होती, त्यातील काही कलमे रद्द करण्यात आली असून नवीन कायद्यात ३५८ कलमे आहेत. “आम्ही बहुतेक पोलिस अधिकाऱ्यांना नवीन फौजदारी कायद्यांबद्दल संपूर्ण प्रशिक्षण दिले आहे. तीन नवीन कायद्यांशी संबंधित प्रशिक्षण सामग्री सर्व प्रादेशिक आणि विभागीय कार्यालयांना प्रदान करण्यात आली आहे,” असे मुंबई पोलीस दलाचे सह पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, (कायदा आणि सुव्यवस्था) यांनी सांगितले. सर्व पोलिस ठाणी नवीन फौजदारी कायद्यांद्वारे अनिवार्य केलेल्या योग्य दुरुस्त्या आणि तरतुदींनुसार अद्ययावत आहेत. तसेच, जुन्या आणि नवीन कायद्यांचे तुलनात्मक तक्ते तयार संदर्भासाठी प्रदान केले आहेत. प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या मुख्य वैशिष्ट्यांवर आणि नवीन कायद्यांतर्गत महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांच्या तरतुदींवर समाजातील घटक.” चौधरी यांनी सांगितले. (New Criminal Law)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.